Marathi Serial Update : झी मराठी वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' (Tula Shikvin Changlach Dhada) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यातच दिवसेंदिवस मालिका रंजक वळण घेत असल्याचं पाहायला मिळतंय. प्रेक्षकांचंही मालिकेला प्रेम मिळत आहे. नुकतीच अक्षराने अधीपतीला तिच्या प्रेमाची कबुली देखील दिली आहे. प्रेमाची कबुली दिल्यावर त्यांचं नातं अधिक फुलताना दिसत आहे. अक्षरा आणि अधिपतीचा खरा संसार आता कुठे सुरु झालाय.
पण भुवनेश्वरी देवी अक्षरा आणि अधिपतीच्या संसारात वादळ आणण्याच्या तयारीत आहे. त्यांच्या नात्याला अजून घट्ट करण्यासाठी आजी ठरवते की त्यांच्यासाठी काहीतरी करायचे. अधिपती-अक्षराची खोली सजवण्याची तयारी आजी सुरु करते. ही गोष्ट जेव्हा भुवनेश्वरीला कळते तिचा संताप होतो. भूवनेश्वरी त्यांना वेगळं करण्याचा नवा कट रचतेय.
भुवनेश्वर देवी आता कोणता कट रचणार?
भुवनेश्वर देवी अधिपती आणि अक्षराला वेगळं करण्याचा कट रचतेय. भुवनेश्वरी मुद्दाम दुर्गेश्वरीला त्यांची खोली जातीने लक्ष घालून सजवण्याचा आदेश देते. काय आहे भुवनेश्वरीची नवीन प्लान? अक्षरा अधिपतीमध्ये होईल का एका नव्या नात्याची सुरुवात? याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेबद्दल जाणून घ्या...
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेची कथा खूपच रंजक आहे. ही मालिका आहे एका शिक्षिकेची म्हणजेच अक्षराची जी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे, आणि अधिपतीची जो कमी शिकलेला पण गर्भ श्रीमंत आहे. अक्षरा सुंदर, सुशिक्षित, गुणी आणि तत्वनिष्ठ मुलगी आहे तिची शिक्षणाविषयी ठाम भूमिका आहे, शिक्षण फक्त प्रगती करत नाही तर चरित्र घडवत. तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम करत असं तीच म्हणणं आहे, म्हणून तिने शिक्षण क्षेत्र स्विकारलं.
दुसरीकडे मालिकेचा नायक अधिपतीचे अनेक व्यवसाय आहेत, त्याच्या मालकीची एक शाळा देखील आहे. पण त्याने नववीनंतर शिक्षण सोडलं कारण त्याच्या आईच म्हणणं आहे की शिक्षणाने कुणाचं भलं होत नाही, शिक्षण हे गरिबांसाठी असत त्यामुळे त्यांना नोकरी लागते, अधिपतीसाठी शिक्षण कधीही त्याच्या आड आलं नाही कारण त्याने अनेक व्यवसाय यशस्वीपणे केले आहेत. अधिपतीच आईवर खूप प्रेम आहे, अधिपती अक्षराच्या प्रेमात पडला पण मनातून खुश नसूनही आईने त्या दोंघाच लग्न लावून दिलं आहे.
ही बातमी वाचा :
Myra Vaikul : मायराला पडली 'पुष्पा 2'ची भुरळ, पण नेटकरी म्हणतात, 'अभ्यासात लक्ष दे...'