Myra Vaikul:   छोटी परी म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मायरा वायकुळ (Myra Vaikul) ही आता मोठ्या पडद्यावरही झळकली. मायरा ही नुकतीच नाच गं घुमा या सिनेमातून भेटीला आली होती. मायरा ही सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. तसेच तिचे गाण्यांवरचे अनेक व्हिडिओ देखील तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे सोशल मीडियाचे अकाऊंट तिची आई श्वेता वायकुळ या हँडल करतात. पण कधी तिच्या बोलण्यामुळे तर कधी तिच्या व्हिडिओमुळे मायरा आणि तिचे आईवडिलही बरेच ट्रोल होतात. 


मायराने नुकतच पुष्पा 2 मधील गाण्यावर तिचा व्हिडिओ टाकला आहे. यामध्ये ती पावसात भिजताना देखील दिसत आहे. तिने या गाण्यावर नेहमीप्रमाणेच भन्नाट डान्स केला आहे. पण यावर पुन्हा एका नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. तिच्या या व्हिडिओवरही अनेकांनी कमेंट्स करुन तिला ट्रोल केलं आहे. 


मायराच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स


मायराच्या या व्हिडिओवर एकाने कमेंट करुन म्हटलं की, वयापेक्षा मोठी होत आहे, अभ्यासात लक्ष दे. अश्या रिल्स करण्यात टाईमपास करुन काही होणार नाही. दुसऱ्या युजरने कमेंट केली आहे की, डोक्यात जाते ही मुलगी. एकाने म्हटलं की, चल बस झालं आता मोठी झालीस, हे बंद कर आणि शाळेत जा.          






दरम्यान मायराचं आणि तिच्या आईवडिलांना वारंवार होणाऱ्या ट्रोलिंगवर मायराचे वडील गौरव वायकुळ यांनी देखील भाष्य केलं होतं. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, 'माझ्यासाठी ती नकारत्मकता मॅटर करतच नाही. कारण तिथे 1000 कमेंट्स येतात. त्यातील 10 कमेंट्स या निगेटीव्ह असतात. पण माझ्यासाठी उरलेल्या कमेंट्स माझ्यासाठी जास्त महत्त्वाच्या आहेत. कारण तिच एक गोष्ट आपण चांगली मुलांना देऊ शकतो, मुलांना निगेटीव्हिटी आपण नाही दिली पाहिजे. प्रत्येकाला त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे. पण मायराच काय कोणत्याही मुलाला जज करणं हे चुकीचं आहे.' 






ही बातमी वाचा : 


Marathi Serial Update : अखेर पापांचा घडा भरणार अन् शेवट गोड होणार, स्टार प्रवाहवरील 'ही' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप