Tu Tevha Tashi : झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi) या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासून पसंती दर्शवली. या मालिकेतील अनामिका आणि सौरभची अव्यक्त प्रेमकथा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. आता प्रेक्षकांना मालिकेत लवकरच एक आश्चर्यकारक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत अनामिका आणि पट्याच्या प्रेमकहाणी सोबत नील आणि राधाची प्रेमकहाणी देखील प्रेक्षकांना पाहायला आवडतेय. अनामिका सौरभ लग्न कधी करणार याकडे मालिकेच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले असतानाच, मालिकेत अचानकपणे आश्चर्यकारक घडामोडी घडताना दिसणार आहेत.
नुकतेच एका गाण्यासाठी मालिकेच्या कलाकारांनी नटूनथटून सेटवर हजेरी लावली होती. यावेळी मालिकेत एक गाणं दाखवले जाणार आहे, ज्यात सर्व कलाकार सजून गाण्यावर ठेका धरताना दिसणार आहे. या गाण्याच शूटिंग नुकतंच झालं असून झाले असून, हे गाणं येत्या रविवारी 1 तासाच्या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
का सुरु आहे हा सोहळा?
मात्र, मालिकेतला हा सोहळा नेमका कशासाठी हे अजूनही गुलदस्त्यात ठेवलेले पाहायला मिळत आहे. प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण म्हणजे अनामिका आणि सौरभचे लग्न. हा सोहळा त्यांच्या लग्नाचा तर नसेल ना? हे जाणून घेण्यासाठी महाएपिसोडची उत्सुकता अधिक वाढली आहे. या गाण्यासाठी वल्ली आणि अनामिका देखील एकत्र आल्या आहेत. सोबतच चंदू चिमणा चिमणीचीही जोडी गाण्यात झळकणार आहे. या विशेष भागात अनामिका आणि सौरभ प्रेक्षकांना एक सरप्राईज देणार आहेत. हे सरप्राईज काय असेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.
सौरभ अनामिकासमोर बोलून दाखवल्या मनातील भावना!
शाळेच्या रियुनियनमध्ये सगळे मित्र अनेक वर्षांनंतर भेटतात. याच कार्यक्रमात सौरभने अनामिका समोर त्याच्या मनातील भावना बोलून दाखवल्या आहेत. आपण प्रेम करत असलेली मुलगी अनामिकाच आहे, हे त्याने अनामिकाला सांगितले आहे.
पहिल्या प्रेमाचं आपल्या आयुष्यात खूप खास स्थान असतं आणि त्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात आयुष्यभर साठलेल्या असतात. अशातही जर ते पहिलं प्रेम व्यक्त करायचं राहून गेलं असेल तर? अशाच अव्यक्त प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या
Tu Tevha Tashi : 'तू तेव्हा तशी' मालिकेतील कलाकारांनी हापूस आंब्यावर मारला ताव; केली हापूस पार्टी
Tu Tevha Tashi : 'तू तेव्हा तशी' मालिकेत नवा ट्विस्ट; कॉलेज रियुनियन ठरणार निर्णायक