The Kapil Sharma Show: कॉमेडियन कपिल शर्माचा 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) हा लोकप्रिय टीव्ही शो आहे. या शोमध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावतात.'द कपिल शर्मा शो' च्या  एका एपिसोडमध्ये अभिनेत्री मंदाकिनी (Mandakini), संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) आणि वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांनी हजेरी लावली आहे. या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये मंदाकिनी, संगीता बिजलानी आणि वर्षा उसगावकर  यांना कपिल हा मजेशीर किस्से सांगताना दिसत आहे. 


द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, कपिल शर्मा म्हणतो, 'मंदाकिनी यांचा 'राम तेरी गंगा मैली' हा चित्रपट जेव्हा आला तेव्हा प्रत्येकजण त्यांना पाहून वेडा झाला होता. काही विवाहित पुरुषांना आपल्या बायकोच्या भीतीने मंदाकिनी यांचे पोस्टर घरात लावता येत नव्हते. ते नंतर बायकोच्या फोटोमागे   मंदाकिनी यांचा फोटो लावायचे.' कपिलचा हा किस्सा ऐकून सर्वजण हसतात. 


पाहा प्रोमो






द कपिल शर्मा शो होणार बंद? 


23 एप्रिल  2016 रोजी 'द कपिल शर्मा' शोची सुरूवात झाली.  कपिल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. जून महिन्यात ‘द कपिल शर्मा शो’ बंद होणार आहे, असं म्हटलं जात होतं. आता 'हा शो खरच बंद होणार आहे का?' असा प्रश्न एका मुलाखतीमध्ये कपिलला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत कपिल म्हणाला, 'हे अजून निश्चित झालेले नाही. आम्हाला जुलैमध्ये टूरसाठी यूएसएला जायचे आहे आणि नंतर आम्ही याबबात विचार करु. अजून बराच वेळ आहे.'


द कपिल शर्मा शोमध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. काही सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमामध्ये हजेरी लावत असतात. काही दिवसांपूर्वी रवीना टंडन, गुनीत मोंगा आणि सुधा मुर्ती यांनी द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी या तिघींनी विविध किस्से प्रेक्षकांना सांगितले. 


संबंधित बातम्या


The Kapil Sharma Show :  'द कपिल शर्मा शो'मध्ये सुधा मुर्ती, रवीना टंडन आणि गुनीत मोंगा यांनी लावली हजेरी; सांगितले मजेशीर किस्से