Khupte Tithe Gupte Ashok Saraf : अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) लोकप्रिय 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाच्या आगामी भागात अशोक सराफ (Ashok Saraf) हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अशोक सराफ त्यांना मामा नाव कसं पडलं हे सांगताना दिसत आहेत. 


अशोक सराफ हे 'मामा' या नावाने ओळखले जातात. मराठी-हिंदी मनोरंजसृष्टीसह चाहतेदेखील त्यांना मामा म्हणूनच हाक मारतात. आजवर त्यांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. मराठी-हिंदी सिनेमे, मालिका आणि नाटकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आता अवधूत गुप्तेच्या 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली असून त्यांना मामा नाव कसं पडलं याचा खुलासा केला आहे. 






आणि असं पडलं मामा नाव...


'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाच्या व्हायरल प्रोमोमध्ये अवधूत गुप्ते अशोक सराफ यांना प्रश्न विचारताना दिसत आहे की,"तुम्हाला मामा म्हणण्याची सुरुवात कुठून झाली?". त्यावर उत्तर देत अवधूत गुप्ते म्हणाले,"कोल्हापुरात मामा म्हणणं खूप मानाचं समजतात. कोल्हापुरात एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान आमचा कॅमेरामॅन त्यांच्या छोट्या मुलीला एकदा सेटवर घेऊन आला आणि तिला म्हणाला, हे बघ...हे कोण? हे अशोक मामा. लेकीला सांगितल्यानंतर तोदेखील मला मामा म्हणू लागला".   


अशोक सराफ पुढे म्हणाले,"कॅमेरामॅनसोबत सेटवरील सर्व स्पॉट बॉईज आणि काम करणारी मंडळी होती. त्यांना मला काय म्हणायचं हा प्रश्नच होता. साहेब म्हणणं त्यांना लांबच वाटत होतं आणि अशोक तर ते म्हणू शकत नव्हते. म्हणून मग त्यांनीदेखील मला मामा म्हणायला सुरुवात केली. त्यानंतर सर्वच मंडळी मला मामा म्हणू लागली. लोक मला मामा म्हणतात याचा मला जास्त आनंद आहे". 


अशोक सराफ यांचा 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्यादेखील पसंतीस उतरला आहे. या कार्यक्रमासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचं ते कमेंट्स करत सांगत आहेत. अशोक सराफ यांच्या या विशेष भागाची चाहत्यांना उत्सुकता आहे. 
अशोक सराफ यांनी गेली अनेक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. पन्नासहून अधिक हिंदी सिनेमे, दोनशेच्या आसपास मराठी सिनेमे आणि पंधरा मालिका, 25 नाटकं त्यांनी केली आहेत. 


संबंधित बातम्या


Khupte Tithe Gupte : एकनाथ शिंदे की राज ठाकरे? 'खुपते तिथे गुप्ते'च्या पहिल्या भागात कोण हजेरी लावणार?