The Kapil Sharma Show : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने (Ranveer Singh) एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते. आता अभिनेता किकू शारदाने (Kiku Sharda) ‘द कपिल शर्मा शो’मध्ये (The Kapil Sharma Show) त्याच्या या फोटोशूटची खिल्ली उडवली आहे. 10 सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून ‘द कपिल शर्मा शो’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कपिल शर्मा वेलकम शो’च्या पहिल्या एपिसोडमध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) सहभागी झाले आहेत. शोचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यात किकू शारदा देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.


नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कठपुतली’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह, अक्षय कुमार आणि या चित्रपटाची संपूर्ण टीम या शोमध्ये पोहोचली होती. नुकताच या शोचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. या व्हिडीओमध्ये किकू शारदा रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटची खिल्ली उडवताना दिसत आहे.


पाहा व्हिडीओ :



किकू शारदा या शोमध्ये धोबीची भूमिका साकारत आहे. प्रोमोमध्ये किकू शारदा अक्षय कुमारला विचारतो की, ‘तुझी रणवीर सिंहसोबत मैत्री आहे का? असेल तर, आमच्या वतीने त्याची माफी माग. आम्हाला कपडे पोहोचवायला थोडा वेळ लागला आणि कोणीतरी येऊन कपड्यांशिवाय त्याचे फोटो काढले. त्याबद्दल आम्हाला माफ करा.’ कीकू शारदाच्या (Kiku Sharda) या विनोदानंतर उपस्थित सगळ्यांमध्येच जोरदार हशा पिकला.


सोनीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हा प्रोमो पोस्ट करण्यात आला आहे. हा नवीन प्रोमो लोकांना आवडला आहे. त्याच वेळी, काही वापरकर्ते शोच्या जुन्या कलाकारांना खूप मिस करत आहेत. या सीझनमध्ये अभिनेता कृष्णा अभिषेक, चंदन प्रभाकर आणि अभिनेत्री भारती सिंह दिसणार नाहीयत.


रणवीर सिंहचं फोटोशूट चर्चेत!


बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने (Ranveer Singh) जुलैमध्ये न्यूड फोटोशूट केले होते. त्याने एका मॅगझिनसाठी हे फोटोशूट केले होते. यानंतर रणवीर सिंहचे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल झाले होते. त्याने या फोटोशूटसाठी अनेक पोज दिल्या होत्या. या फोटोशूटनंतर त्याला अनेकांनी ट्रोलही केले होते. तर, या फोटोशूटनंतर रणवीर सिंह विरोधात दोन एफआयआर देखील नोंदवले गेले.


प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी


10 सप्टेंबरपासून हा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीनंतर कपिल पुन्हा एकदा त्याच्या संपूर्ण टीमसह सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता प्रेक्षक या कार्यक्रमाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. सोनी टीव्हीने हा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी कपिलला या नव्या सीझनसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


संबंधित बातम्या


The Kapil Sharma Show Date Out : प्रतीक्षा संपली; 'द कपिल शर्मा शो' सप्टेंबरमध्ये होणार सुरू


The Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा शो'चा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; तुम्हीही होऊ शकता सामील, जाणून घ्या...