नवी दिल्ली : सुनील ग्रोव्हरनं कपिलच्या शोला रामराम ठोकल्यापासून कपिलचे ग्रह चांगलेच फिरले आहेत. एकीकडे प्रेक्षकांना आपल्या शोमध्ये हसवताना कपिलची चांगलीच दमछाक होत आहे. तर दुसरीकडे लाईव्ह कार्यक्रमामध्ये सुनील ग्रोव्हर प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन करत आहे.


दिल्लीमध्ये शनिवारी रात्री सुनीलच्या लाईव्ह कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यानं प्रेक्षकांना हसवून हसवून अक्षरश: लोळवलं. तर दुसरीकडे कपिल आपल्या सेटवरचं शूटिंग करत असताना प्रेक्षकांना हसवण्यात असमर्थ ठरला. त्यामुळे त्याला याचं शूटिंग अर्ध्यावरच आवरावं लागलं.

एनएआयने या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, सुनीलनं रोडिओ सिटीच्या सहकार्यानं तालकटोरा स्टेडिअममध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमावेळी सुनीलचं प्रेक्षकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं. सुनीलने या कार्यक्रमात कपिलच्या शोप्रमाणेच वेगवेगळ्या व्यक्तीरेखा साकारल्या. त्याला विनोदी कलाकार किकू शारदा आणि इतर प्रसिद्ध विनोदी कलाकारांची साथ मिळाली. सुनीलच्या व्यक्तीरेखांना प्रेक्षकांनीही चांगली दाद दिली.

तर दुसरीकडे 30 मार्च रोजी कपिलने मुंबईतल्या आपल्या सेटवर नव्या टीमसह शोचं शूटिंग केलं. पण खराब टायमिंगमुळे दहा मिनिटांत एकदाही हसवू शकला नाही. प्रेक्षकांना हसवण्यात अपयश आल्यानं त्याला याचं शूटिंग रद्द करावं लागलं.

संबंधित बातम्या

कपिलच्या शोमध्ये 'नानी'ची 'घरवापसी'?, सुनील ग्रोव्हरवरुन सस्पेंस कायम

सध्या मी निराश आहे, सुनील ग्रोव्हरचं ट्वीट

एअर इंडिया कपिल शर्मावर कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत

…म्हणून कपिल शर्मा मनोज वाजपेयीसमोर ढसाढसा रडला?

‘द कपिल शर्मा शो’ बंद होण्याची चिन्हं, सुनील ग्रोव्हरचा नवा शो?

कपिल शर्माचा माफीनामा, सुनिल ग्रोव्हरचं उत्तर

कपिलच्या शोवरुन सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यात तणाव?

सुनिल ग्रोव्हरसोबतच्या भांडणावर कपिल शर्माची फेसबुक पोस्ट

…म्हणून कपिल शर्मानं विमानातचं सुनिल ग्रोवरला धुतलं