मुंबई : आता घड्याळात 7 वाजले की 'यळकोट यळकोट, जय मल्हार' हा जयघोष झी मराठीवर ऐकायला मिळणार नाही. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या खंडेरायाच्या कथांवर आधारित 'जय मल्हार' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.


'जय मल्हार'च्या जागी आता नवी मालिका येत आहे. सैन्यातील जवानावर आधारित ही मालिका असल्याचं प्रोमोतून दिसतं.

18 मे 2014 रोजी ही मालिका पहिल्यांदा टीव्हीवर झळकली. अल्पावधीतच तुफान लोकप्रियता मिळवलेली आणि टीआरपीचे उच्चांक गाठणारी 'जय मल्हार' ही पौराणिक मालिका एप्रिलअखेरीस संपणार आहे. या मालिकेचे 900 एपिसोड पूर्ण झाले असून 942 हा शेवटचा भाग असेल.

झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये 'जय मल्हार'चा समावेश आहे. खंडोबा आणि बानू विवाहाच्या महाएपिसोडने तर टीआरपीचे अनेक विक्रम मोडले होते. इशा केसकर, सुरभी हांडे आणि देवदत्त नागे यांना हे या मालिकेमुळे घराघरात पोहोचले.

खंडोबा, म्हाळसा आणि बानू कैलासात जाताना दाखवून मालिकेचा शेवट होणार असल्याचं समजतं. 15 एप्रिल हा चित्रीकरणाचा शेवटचा दिवस असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सुमारे तीन वर्षांनी ही मालिका संपणार आहे.

नवीन मालिकेचे प्रोमो