(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tharla Tar Mag : ठरलं तर मग! सायली-अर्जुनच्या नात्यात प्रेमाचं 'कॉन्ट्रॅक्ट,' मनातल्या भावना आता तरी ओठांवर येणार?
Tharla Tar Mag : ठरलं तर मग या मालिकेत सायली आणि अर्जुन त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करणार का? याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
Tharla Tar Mag : स्टार प्रवाहवरील (Star Pravah) ठरलं तर मग (Tharla Tar Mag) मालिकेत सध्या प्रेमाचं वळण आल्याचं पाहायला मिळतंय. कारण सायली आणि अर्जुन यांना एकमेकांच्या प्रेमाची जाणीव झालीये. त्यामुळे आता दोघांनाही त्यांच्या भावना एकमेकांसमोर व्यक्त करायच्या आहेत. त्यातच सध्या त्यांच्यात सुरु असलेल्या प्रेमाचा खेळाचा गोड अनुभवही प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. इतकच नव्हे तर सायलीच्या बाबतीमध्ये अर्जुन दिवसागणिक अधिकच भावनिक होत चालला असल्याचंही चित्र आहे. त्यातच आता सायली आणि अर्जुन लवकरच त्यांच्या भावना एकमेकांसमोर व्यक्त करणार आहेत.
स्टार प्रवाह वाहिनीने नुकताच एक प्रोमो शेअर केलाय. त्यामध्ये सायली आणि अर्जुन हे एकमेकांसाठी असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी रोमँटीक डेट प्लॅन करतात. त्याचवेळी सायली आणि अर्जुनच्या एकमेकांसाठीच्या भावना त्यांच्या ओठांवर येणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
नवा प्रोमो समोर
मालिकेचा नवा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये सायली अर्जुन वाट पाहत चाफ्याची फुलं घेऊन एका रेस्टॉरंटमध्ये बसलेली असते. तेव्हा अर्जुन तिच्यासाठी अंगठी घेऊन येतो. तेव्हा तो सायलीला मिसेस सायली अशी हाक मारतो आणि तिला म्हणतो की, मिसेस सायली मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. त्यावर सायलीही अर्जुनला म्हणते की,मलाही तुम्हाला काय तरी सांगायचं आहे. त्यामुळे आता सायली आणि अर्जुनच्या मनातल्या या भावना ओठांवर कधी येणार याची उत्सुकता आहे. हा प्रोमो शेअर करत त्यावर अर्जुन-सायली एकमेकांसमोर व्यक्त करू शकतील का त्यांच्या मनातलं प्रेम...? असं कॅप्शन देण्यात आलं आहे.
प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस
दरम्यान या प्रोमोवर सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. हा एपिसोड लवकर येऊ द्या रे मनाची उत्सुकता खूप वाढली आहे. आता तर करायला पाहिजे कि राव आम्ही त्याच सीनची वाट बघतोय...स्वप्न तर नाही आहे ना हे....Pls pls pls सांगून टाका एकमेकांच्या मनातलं.... अशा कमेंट्स या प्रोमोवर आल्याचं पाहायला मिळतंय.
View this post on Instagram