Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका जेव्हा सुरु झाली तेव्हापासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तसेच टीआरपीच्या शर्यतीमध्ये देखील हीच मालिका काही महिन्यांपासून अव्वल ठरतेय. जुई आणि अर्जुन म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) आणि अभिनेता अमित भानुषाली (Amit Bhanushali) यांची ऑनस्क्रीन जोडीने मनं जिंकल्याचं पाहायला मिळतंय.


एका वर्षासाठी सुरु झालेल्या अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचा प्रवास आता रंजक वळणावर आलाय. त्यातच सायलीवरच्या प्रेमाचा जाणीव देखील अर्जुनला झालीये. पण यासगळ्यामध्ये चैतन्यचं एक सर्वात मोठं सत्य आता अर्जुनच्या समोर येणार आहे. माथेरानवरुन फिरुन आल्यानंतर अर्जुनला सायलीवरच्या प्रेमाची जाणीव झालीये. त्यातच अर्जुन आणि सायली परत आल्यानंतर पुर्णा आजी देखील घरी आली आहे. यावेळी प्रियाने मात्र तिचा डाव साधलाय.


माथेरानला अर्जुन आणि सायलीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रिया देखील गेली होती. त्यावेळी प्रियाने सायलीच्या सरबतामध्ये दारु मिक्स केली आणि सायलीने त्याठिकाणी हदौस घातला. हाच व्हिडिओ प्रियाने पूर्णा आजीला दाखवला. त्यामुळे पुर्णा आजी सायलीवर चिडली असल्याचं पाहायला मिळणार आहे. पण यावर आता अर्जुन सायलीची कशी बाजू घेणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 


महाएपिसोडच्या प्रोमोमध्ये काय?


रविवार 11 फेब्रुवारी रोजी मालिकेचा महाएपिसोड दाखवण्यात येणार आहे.  माथेरानवरुन आल्यानंतर अर्जुन चैतन्यच्या घरी जात असतो. त्यावेळी सायलीवरच्या प्रेमाची झालेली जाणीव ही सर्वात आधी त्याच्या जवळच्या मित्राला म्हणजेच चैतन्याला सांगण्यासाठी जातो. अर्जुन चैतन्याच्या घरी पोहचतो तेव्हा अर्जुनला चैतन्य आणि साक्षी एकमेकांच्या मिठीत दिसतात. त्यामुळे अर्जुनला एक धक्का बसतो. वात्सल्य आश्रमाची जी केस अर्जुन सांभाळत आहेत, त्यामध्ये मु्ख्य संशयित ही साक्षी आहे. तिच्याच प्रेमात आपला मित्र पडला आहे, हे सत्य अर्जुनला कळल्यानंतर काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 






ही बातमी वाचा : 


Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीचा संसार पुन्हा एकदा मोडणार? आशुतोष - अरुंधतीमध्ये माया नावाचं वादळ, मालिका रंजक वळणार