Munawar Faruqui : बिग बॉस 17 चा विजेत आणि स्टँडअप कॉमेंडियन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) याचे सेलिब्रेशन अजूनही सुरू आहे. बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर मुनव्वरने आतापर्यंत अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली आहे. बिग बॉसमधील स्पर्धकांसोबतही सेलिब्रेशन करताना त्याचे व्हिडीओ, पोस्ट  व्हायरल झाले आहेत. आता  टीम इंडियाच्या (Team India) क्रिकेटपटूसोबत मुनव्वरचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यांच्यासोबत एका चित्रपट निर्मात्याचाही फोटो व्हायरल होत आहे.


मुनव्वर फारुकीने याआधी बिग बॉस 17 मधील स्पर्धकांसोबत सक्सेस पार्टी केली. त्यानंतर यामध्ये अंकिता लोखंडे, विक्की कौशल, ईशा मालवीय, समर्थ जुरेल, रिंकू, जिग्ना आणि मन्नारा चोपडा यांच्यासह अनेक चेहरे दिसून आले. 


टीम इंडियाच्या क्रिकेटपटूसोबत सेलिब्रेशन


मुनव्वरच्या पार्टीत टीम इंडियाचा क्रिकेटपटू  शुभमन गिलचा (Shubhman Gill) फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत मुनव्वर, शुभमन आणि निर्माते राघव शर्मादेखील आहेत. या फोटोवर लाइक्सचा वर्षाव सुरू आहे. 






 


'बिग बॉस 17' च्या स्पर्धकांची सक्सेस पार्टी


'बिग बॉस 17' च्या स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरामध्ये झालेले वाद, मतभेद विसरून सगळ्यांनी रियुनियन करत सेलिब्रेशन केले. 


 










मुनव्वरवर बक्षिसांचा वर्षाव


मुनव्वर फारुकीला बिग बॉस-17 चा विजेता म्हणून कार्यक्रमाची ट्रॉफी मिळाली तसेच  मुनव्वरला 50 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले आहे. तसेच त्याला एक कार देखील मिळाली आहे. लॉक-अप या शोमुळे मुनव्वरला विशेष लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाचा देखील मुनव्वर विजेता ठरला होता. हा कार्यक्रम जिंकल्यानंतर मुनव्वरला ट्रॉफी, 20 लाख रुपयांचे रोख पारितोषिक, कार मिळाली होती.


इतर महत्त्वाच्या बातम्या :