Aai Kuthe Kay Karte :  अरुंधतीच्या (Arundhati) संसार पुन्हा एकदा मोडणार का असा प्रश्न मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे उपस्थित केला जात आहे. तसेच आशुतोष अरुंधतीच्या (Aai Kuthe Kay Karte) संसारात माया नावाचं वादळ आलं आहे. आता हे वादळ अरुंधतीचा संसार पुन्हा एकदा मोडणार की आशुतोष - अरुंधती आणखी जवळ येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


सध्या या मालिकेत प्रत्येक पात्राच्या आयुष्यात काही ना काही उलथापालथी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आशुतोषसोबत नवा संसार सुरु केल्यानंतर अरुंधतीच्या वाट्याला रोज नवं काहीतरी येत होतं. तर आता पुन्हा एकदा तिच्या संसारात एक नवं वादळ आल्याचं पाहायला मिळत आहे. 


अरुंधती आणि अनिरुद्धच्या संसारात संजना नावाचं वादळ आलं आणि अरुंधतीचा 25 वर्षांचा संसार मोडला. त्यानंतर अरुंधतीने तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. यावेळी तिच्या कॉलेजमधील मित्र आशुतोष केळकर अरुंधतीला भेटला आणि त्याने अरुंधतीला लग्न करण्याची मागणी घातली.


या सगळ्यात अरुंधतीने देखील आशुतोषसोबत नवा संसार मांडला. तसेच अनिरुद्ध आणि संजानाने देखील त्यांचा दुसरा नवा संसार सुरु केला. पण जे वादळ अरुंधती आणि आशुतोषच्या संसारात आलं तसंच वादळ आता अरुंधती आणि आशुतोषच्या संसारात येणार का हा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय.


प्रोमोमध्ये नेमकं काय?


अरुंधतीच्या आईला बरं नसतं म्हणून अरुंधती काही दिवस तिच्या आईकडे जाते. मायाने तीच मनूची आई असल्याचं सांगत तिने केळकरांच्या घरी प्रवेश केला आहे. अरुंधती घरात नसताना माया आशुतोषच्या घरी येते. त्यावेळी घरात फक्त आशुतोष असतो. मायाची हातून पाणी सांडतं आणि आशुतोष त्यावरुन पाय घसरुन पडतो. तेव्हा माया त्याला मदत करते आणि त्याला कुठे लागलं ते पाहत असते.


तेव्हाच अरुंधती येते आणि ती आशुतोषला काय झालं असा प्रश्न विचारते. आशुतोष तिला घडला प्रकार सांगतो आणि औषध आणायला जातो. त्यावेळी माया देखील अरुंधतीला घडला प्रकार सांगते आणि कोणत्याही प्रकारचा गैरसमज करुन घेऊ नको असं म्हणते. त्यावर मी अशा नजरा चांगल्याच ओळखून असल्याचं उत्तर अरुंधती मायाला देते. 






ही बातमी वाचा :


Marathi Actor : 'सैराट' फेम अभिनेत्याचं नवं पाऊल, स्वत:च्या नव्या व्यवसायाची पुण्यात केली सुरुवात