Monika Dabade Pregnancy Announcement  : 'ठरलं तर मग' या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. अनेक प्रेक्षक या मालिकेशी जोडले गेले आहेत. मालिकेतील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळताना दिसत आहे. या मालिकेतील कलाकारांच्या खऱ्या आयुष्याशीही प्रेक्षक जोडले गेले आहेत. या मालिकेतील अनेक कलाकार सोशल मीडियावर त्यांच्या रिअल लाईफमधील अपडेट्स शेअर करत असतात. आता या मालिकेतील अभिनेत्रीने चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली आहे.


'ठरलं तर मग' मालिकेतील अभिनेत्रीने दिली गूड न्यूज


'ठरलं तर मग' मालिकेतील अर्जुन सुभेदारची बहिण अस्मिताची भूमिका साकारणारी मोनिका दबडे हिने चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली आहे. अभिनेत्री मोनिका दबडे लग्नाच्या 9 वर्षांनंतर आई होणार आहे. मोनिकाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत ही गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


सोशल मीडिया पोस्टद्वारे घोषणा






अभिनेत्री लग्नाच्या 9 वर्षांनंतर होणार आई


अभिनेत्री मोनिका दबडेने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर एक फोटो शेअर करत ती आई होणार असल्याची घोषणा केली आहे. मोनिका दबडे हिने पती अमित सोबतचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये दोघांच्या हातात लहान बाळाचे शूज दिसत आहेत. या फोटोंना कॅप्शन देताना लिहिलंय, 'एप्रिल 2025'. यावरुनच मोनिका दबडे तिच्या पहिल्या बाळाचं स्वागत एप्रिल 2025 मध्ये करणार आहे, हे स्पष्ट होत आहे. तिच्या या पोस्टवर सहकलाकार आणि मित्रमंडळींकडून शुभेच्छा मिळत आहेत.






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Priya Bapat : लग्नानंतर 13 वर्षानंतरही मुलं नाही, बाळ होण्याच्या प्रश्नावर अभिनेत्री प्रिया बापट स्पष्टच म्हणाली...