Bigg Boss 18: बिग बॉसच्या 18व्या सीझनमध्ये आता एखादा दिवस जरी हंगामा झाला नाही तर प्रेक्षकांना अगदी चुकचुकल्यासारखेच होईल. पण बिग बॉसमध्ये शांततेची अपेक्षा मुळातच चुकीची! नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये तर टाईम गॉडच्या ट्रॉफीसाठी हाणामारीपर्यंत विषय गेला होता. यंदाच्या आठवड्यात टाईम गॉड होण्यासाठी झालेल्या टास्कमध्ये रजत विवियन आणि अविनाशमध्ये हातापायी झाली. तिकडे साराही मेंटली डिस्टर्ब दिसली. शेवटी या सगळ्या प्रकारावर काय ॲक्शन घेतली गेली पाहूया..
अविनाश दिग्विजयमध्ये वादावादी
बिग बॉसच्या घरात काल अविनाश आणि दिग्विजय या दोन स्पर्धकांमध्ये मोठी वादावादी झाली. चोरीच्या आरोपावरून अविनाशने तोंडाचा पट्टा सुरू केला. अविनाशच्या आरोपांवर दिग्विजय या घरात सगळ्यात आधी चोरी तूच केलीस असं म्हणत अविनाशला भिडला. दोघांमध्ये जोरदार भांडण झाली. घरात आल्यापासून दिग्विजय अग्रेसिव्ह मोडमध्ये दिसत आहे.
रजत अविनाशमध्ये हाणामारीपर्यंत गेला प्रकार
रजत दलाल ने विवियन डीसेनाला विचारले की तो त्याच्या बेडवर झोपला होता तेव्हा रात्री तो का काही बोलला नाही. विवियन म्हणाला हे चांगले मॅनर्स आहेत. त्यावर रजत भडकला. चांगले मॅनर्स स्वतःकडेच ठेवा असं म्हणत या दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. दोघे एकमेकांच्या अंगावर धावले. शिवीगाळ आणि मारामारी झाली तर काय होईल असा प्रश्न विविनने केला. रजत आणि अविनाशमध्ये वादावादी होत मारहाणी प्रयापर्यंत प्रकरण जाताना दिसल्यावर घरातले सदस्य त्यांच्यामध्ये पडून त्यांना थांबवले.
कोणाची टीम जिंकली?
कलर्सटीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये विवयन डिसेनाकडून टाईम गॉडचा किताब काढून घेण्याची वेळ आली आहे. यासाठी करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकरही जोर लावताना दिसत आहे. घरातल्या स्पर्धकांना A आणि B टीममध्ये विभागण्यात आले आहे. जी टीम जिंकेल त्या टीममधील एका सदस्याला आठवडाभरासाठी टाईमगॉड किताब मिळणार आहे. टाईम गॉडच्या टास्कमध्ये करणवीरची टीम जिंकली.
विवियन डीसेनाने आठ सदस्यांना केलं नॉमिनेट
विवयाने रजत दलालला सर्वात आधी नॉमिनेट केले त्यानंतर चाहत पांडे आणि श्रुतिकाला नॉमिनेट केल्याचे दिसले. याचवेळी चाहतनेही याच शोमध्ये तुझा अहंकार तोडून टाकेन असं आव्हान दिलं. चाहतनंतर विवियनने श्रुतिका, करणवीर मेहरा, सारा, अरफिन खान ताजिंदर बग्गा आणि चुम दरांग यांचेही नाव घेतलं. पण यानंतर एक ट्विस्ट बिग बॉस ने आणला आणि घरातील चार सदस्य नॉमिनेट झाले आणि उरलेले वाचले.