Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. सायलीच्या प्रेग्नंसीचा कट कोणी रचलाय हे आता समोर येणार आहे. त्यामुळ मालिकेच्या आगामी भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 


'ठरलं तर मग' या मालिकेत सध्या सायलीच्या खोट्या प्रेग्नंसीचा सीक्वेन्स सुरू आहे. सायली आणि अर्जुनने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे. त्यामुळे ती गरोदर असल्याचं डॉक्टरांनी कसं काय सांगितलं याबद्दल ते चिंता व्यक्त करत आहेत. मालिकेत सायली आणि अर्जुन चिंतेत असले तरी सुभेदार कुटुंबीय आणि कल्पना मात्र खूपच आनंदात आहेत. 


सायली आणि अर्जुनने कॉन्ट्रॅक्स मॅरेज केलं आहे. ते लग्नाचं खोटं नाटक करत आहेत. फक्त चैतन्य आणि कुसुमलाच हे माहिती आहे. त्यामुळे आता सायच्या प्रेग्नंसीचे खोटे रिपोर्ट आल्याने अर्जुनला पुढे काय करायचं हे कळत नाही. घरातल्यांच्या आनंदासाठी हे सहन करू असं तो सायलीला सांगतो. अर्जुन आणि सायलीचा संवाद अस्मिता चोरून ऐकते आणि तिला संशय येतो. त्यामुळे सायलीला त्रास देण्यासाठी प्रियाच्या साथीने ती नवा डाव रचते.




अस्मिता आणि प्रियाचा नवा डाव


सायलीला त्रास देण्यासाठी अस्मिता आणि प्रियाने नवा डाव रचला आहे. अस्मिता सायलीच्या ताकात औषध मिसळते. त्यामुळे घरातल्यांसमोर तिला चक्कर, मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ लागतो. सायलीला होत असलेला त्रास पाहून ती प्रेग्नंट असल्याचा संशय सुभेदार कुटुंबीयांना येतो. त्यानंतर कल्पना अर्जुन आणि सायलीला डॉक्टरांकडे पाठवते. दरम्यान नर्सला पैसे देऊन प्रिया सायलीचे खोटे रिपोर्ट्स बनवून घेते. 


प्रिया आणि अस्मिताला सायली आणि अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्स मॅरेजचं सत्य सर्वांसमोर आणायचं आहे. त्यामुळे ते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. आता प्रियाने निर्माण केलेल्या समस्येतून सायली आणि अर्जुन कसा मार्ग काढणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.


'ठरलं तर मग' मालिकेबद्द जाणून घ्या...


'ठरलं तर मग' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतदेखील पहिल्या क्रमांकावर आहे. टीआरपीच्या शर्यतीत या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे. आता मालिकेच्या आगामी भागांची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. 


संबंधित बातम्या


Tharala Tar Mag : छोट्या पडद्यावर जुई गडकरीचं राज्य! टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग' पहिल्या क्रमांकावर