Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. या नव्या ट्विस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मालिकेच्या आगामी भागात कल्पना सायली आणि अर्जुनला हनिमूनचं सरप्राईज देताना दिसत आहे.


'ठरलं तर मग' ही मालिका प्रेक्षक आवडीने पाहत आहेत. सध्या मालिकेत कोर्टरुम ड्रामा पाहायला मिळत आहे. एकीकडे अर्जुन महिपत आणि साक्षी शिखरे विरोधात पुरावे गोळा करुन मधुभाऊंना सोडवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे आता सुभेदारांच्या घरी कल्पना अर्जुन आणि सायलीचं नातं आणखी घट्ट करण्यासाठी विविध प्रयत्न करत आहे. 


'ठरलं तर मग'च्या प्रोमोने वेधलं लक्ष


'ठरलं तर मग' या मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये सुभेदारांच्या घरातील सर्व मंडळी डायनिंग टेबलवर जेवणासाठी बसलेली दिसत आहेत. दरम्यान अर्जुन ताट आणि चमचा वाजवत म्हणतो,"ऐका हो ऐका कल्पना प्रताप सुभेदार यांच्याकडे एक सरप्राईज आहे आणि ते ऐकल्याशिवाय कोणीही जेवणार नाही". 






अर्जुनच्या गोंधळामुळे सायली म्हणते,"आई कान फुटायच्या आत तुम्ही सांगून टाका". यावर कल्पना सगळ्यांना शांत करत अर्जुन-सायलीला म्हणते,"हे सरप्राईज तुम्हा दोघांसाठी आहे. दोघंजण हनिमूनला जाताय". कल्पनाच्या बोलण्यानंतर सायली आणि अर्जुनला आश्चर्याचा धक्का बसतो. त्यामुळे आता सायली-अर्जुन हनिमूनला जाणार की मालिकेत आणखी कोणता नवा ट्वीट येणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग'ची बाजी


'ठरलं तर मग' ही मालिका गेल्या काही दिवसांपासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. टीआरपीच्या शर्यतीत या मालिकेला 6.7 रेटिंग मिळाले आहे. मालिकेचा प्रत्येक भाग प्रेक्षक आवडीने पाहत आहेत. 'ठरलं तर मालिका' दर आठवड्याला टीआरपीचे नवनवे उच्चांक गाठत आहे. महाराष्ट्राच्या या नंबर वन मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. मालिकेतील अर्जुन आणि सायलीमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे. आदेश, सुचित्रा आणि सोहम बांदेकर या मालिकेचे निर्माते आहेत. 


संबंधित बातम्या


Tharala Tar Mag : सायली सगळ्यांना सांगणार ती प्रेग्नंट नसल्याचं सत्य, 'ठरलं तर मग' मालिकेचा रंगणार विशेष भाग; प्रोमो आऊट