Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...


Anupamaa: अनुपमा आणि गुरुमा 'बहरला हा मधुमास नवा' गाण्यावर थिरकल्या; व्हिडीओ व्हायरल


Anupamaa: छोट्या पडद्यावरील 'अनुपमा' (Anupamaa) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेमधील अभिनेत्री  रुपाली गांगुली  (Rupali Ganguly)  यांच्या अभिनयाचे अनेक जण कौतुक करतात. नुकताच रुपाली यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रुपाली आणि अनुपमा या मालिकेतील गुरुमा ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अपरा मेहता या 'बहरला हा मधुमास नवा'  या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. 



Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीने संजनाला दिलं लढण्याचं बळ; 'आई कुठे काय करते !' मालिकेच्या प्रोमोनं वेधलं लक्ष


Aai Kuthe Kay Karte:  आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  मालिकेच्या गेल्या एपिसोडमध्ये दिसले की, वीणा ही अनिरुद्धसाठी एक केक आणते. तो केक अनिरुद्ध सगळ्यांसमोर कापतो पण संजनाचा वाढदिवस त्याच्या लक्षात राहात नाही. त्यानंतर संजना आणि अनिरुद्धचं भांडण होतं. संजना ही अनिरुद्धच्या वागण्यामुळे दु:खी होते. त्यानंतर ती वाढदिवस साजरा करण्याऐवजी रडत बसते. आई कुठे काय करते मालिकेच्या एका प्रोमोमध्ये दिसत आहे की,  अरुंधती ही संजनाला समजवण्याचा प्रयत्न करते. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Tuzech Mi Geet Gaat Aahe: स्वराला पडलं वाईट स्वप्न; 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो व्हायरल


Tuzech Mi Geet Gaat Aahe:   तुझेच मी गीत गात आहे  (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या छोट्या पडद्यावरील मालिकेमधील विविध ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी मंजुळाची एन्ट्री झाली आहे. मंजुळा ही वैदेही सारखी दिसते.  वैदेही ही मल्हारची पहिली पत्नी आणि स्वराज उर्फ स्वराची आई होती. काही महिन्यांपूर्वी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमधील वैदेही या भूमिकेचा मृत्यू झाला. मंजुळाचा चेहरा स्वराजनं पाहिला आहे, पण मल्हारनं पाहिला नाही. तुझेच मी गीत गात आहे मालिकेचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिसते की, स्वराजला एक वाईट स्वप्न पडते. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Khupte Tithe Gupte : 'तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंचा फोन आला होता'; ‘खुपते तिथे गुप्ते’ मध्ये नारायण राणेंनी सांगितला किस्सा


Khupte Tithe Gupte : अवधूत गुप्तेचा (Avadhoot Gupte)  ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.  'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात नारायण राणे (Narayan Rane) हे  हजेरी लावणार आहेत. नुकताच खुप्ते तिथे गुप्ते  या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये नारायण राणे हे एक आठवण सांगताना दिसत आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Khatron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13'मध्ये झळकणार शिव ठाकरे आणि अब्दू रोझिक


Khatron Ke Khiladi 13 Latest Update : 'खतरों के खिलाडी 13' (Khatron Ke Khiladi 13) हा कार्यक्रम सध्या चर्चेत आहे. आता या कार्यक्रमासंदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे. जुलै महिन्यात सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अब्दू (Abdu Rozik) आणि शिव ठाकरे (Shiv Thakare) दिसत आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा