Shark Tank Season 3 :  'शार्क टँक इंडिया 3' (Shark Tank Season 3) नुकताच झालेला एपिसोड हा एका स्नॅक्स कंपनीच्या पिचने सुरु झाला. या पिचमध्ये चवीशी तडजोड न करता आरोग्यसाठी पर्यायी स्नॅक्स कसे तयार करत आहेत, यासंदर्भात पिच करण्यात आली. जंक फूड आरोग्यासाठी फारसे चांगले नसतात. त्यामुळे या जोडप्याने आरोग्यदायी असणाऱ्या स्नॅक्सची निर्मिती या कंपनीकडून करण्यात आली आहे. पण या जोडप्याच्या बिझनेस आडियावरुन अझहर आणि विनीतामध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. 


जेव्हा या जोडप्याने त्यांची बिझनेस पिच सुरु केली तेव्हा त्यांनी इतर स्नॅक्स लोकांसाठी कसे आरोग्यदायी नाहीत आणि म्हणूनच त्यांनी त्याचा एक आरोग्यदायी पर्याय शोधून काढल्याचं स्पष्ट केलं. अमन, विनीता आणि इतरांना त्यांनी त्यांचे प्रोडक्ट चाखायला दिले. तसेच या जोडप्याने लग्नासाठी मोठा खर्च न करता साध्या मंदिरात लग्न केलं. तसेच ते पैसे त्यांनी त्यांच्या बिझनेससाठी वापरले.


नेमकं काय घडलं?


  या पिचदरम्यान या जोडप्याने 2.5 टक्के इक्विटीसाठी 90 लाख रुपयांची मागणी केली. विनीताने त्यांच्या या बिझनेस आडियाचं कौतुक देखील केलं.  दरम्यान या जोडप्याच्या या प्रोडक्टचं सर्वांनीच कौतुक केलं. पण या जोडप्याने त्यांच्या या बिझनेसच्या पिचमध्ये 90 लाख रुपयांची मागणी केली. पण ही मागणी जास्त असल्याचं  अझहरचं म्हणणं होतं. त्यामुळे विनीता आणि त्याच्यामध्ये या पिचदरम्यान वाद झाल्याचं पाहायला मिळालं. अझहरने जो सल्ला या जोडप्याला दिला, त्याला प्रत्येक शार्कने विरोध केल्याचं पाहायला मिळालं. 






पिचर्सने बिझनेससाठी केली ही गोष्ट


या पिचमध्ये पिचर्सनी त्यांच्या बिझनेससाठी कोणत्या गोष्टी केल्या यासंदर्भात देखील भाष्य केलं आहे. आपल्या आईवडिलांना समजावून त्यांनी कोणत्याही मोठा लग्नसोहळा न करता अगदी साध्या पद्धतीनं लग्न केलं. त्यांची ही गोष्ट ऐकून सगळे शार्क अगदीच भारावून गेल. आम्ही आमच्या लग्नामधून 50 ते 60 लाख रुपये वाचवू शकलो, ज्याचा फायदा आम्हाला बिझनेससाठी झाला असं या पिचर्सनी सांगितलं. 


ही बातमी वाचा : 


Kedar Shinde Aaipan Bhari Deva : केदार शिंदे सांगणार प्रत्येक घरातल्या आईपणाची गोष्ट; ‘आईपण भारी देवा’ चित्रपटाची घोषणा