Premachi Goshta Latest Episode :  मुक्ताला सरप्राईज देण्यासाठी सागर मोठ्या प्रयत्नाने पुरणपोळी तयार करतो. पुरणपोळी करताना सागरला त्याची सासू माधवी प्रेमाचे गमक सांगते. तर, दुसरीकडे सागर आणि मुक्ताचा सईसोबत फोटो सोशल मीडियावर पाहून सावनीचा जळफळाट होतो. 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) या मालिकेत आज कुटुंबातील आनंद दिसणार आहे.


मुक्ताला प्रेमाने जिंकण्यासाठी सागरची धडपड सुरू असते. या धडपडीचा एक भाग म्हणून सागर हा सासूबाई माधवीच्या मार्गदर्शनात पुरणपोळी तयार करतो. पुरणपोळी तयार करताना माधवी ही प्रेम आणि पुरणपोळी सारखेच असते. चटके खाऊन प्रेम अगदी पोळीसारखं अलगद फुलवायचे असते, असे सागरला सांगते. पुरणपोळी तयार झाल्यानंतर माधवी मुक्ताला घरी येण्यासाठी फोन करते. आईने का बोलावले याचा विचार करत मुक्ता काळजी करत घाई-घाईने घरी येते. त्यावेळी घरी सगळं आलबेल असल्याचे कळते. 


सरप्राईजने मुक्ताला सुखद धक्का


घरी आल्यानंतर मुक्ताला सागरचे सरप्राईज समजते आणि खूश होते. हे सगळं स्वप्नवत असल्यासारखे वाटतंय असे मुक्ता म्हणाली. त्यावेळी तिचे वडील आज तुझे स्वप्न पूर्ण झाल्याचे म्हणतात. सागर म्हणतो की, सई नेहमी मुक्ताईला सरप्राईज द्यायचे असे म्हणते. मात्र, आज सईला नाही तर मला सरप्राईज द्यायचे आहे, असे मुक्ताला सागर सांगतो. सागरच्या सरप्राईजने मुक्ता भारावून जाते. पुरणपोळी मुक्ता आवडते.  ईच्या पुरणपोळीच्या चव माहित आहे, ही चव वेगळी आहे पण छान आहे असे मुक्ता म्हणते आणि सागरच्या प्रयत्नांना दाद देते.  


मुक्तासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी सागर खिशातून मोबाईल फोन काढत असतो. त्याचवेळी त्याच्या खिशातून पुरणपोळीचे बिल पडते. त्याचे मुक्ताला हसू येते आणि पुरणपोळी पडली असे सांगते. सागरलादेखील यावर काय बोलावे हे कळत नाही. पण किचनमधील पसारा पाहून मुक्ताला विश्वास वाटतो की सागरने पुरणपोळी तयार करण्यासाठी मेहनत घेतली. सागर मुक्ता सईसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. हा फोटो पाहुन सावनीचा जळफळाट होतो. 


माधवी जावई सागरचे कौतुक करते. सईसाठी तुम्ही लग्न केले असे वाटले पण होते, सागर ज्याप्रमाणे पाठिशी उभा राहिला आणि आज पुरणपोळी तयार केली त्यावरून आता काळजी मिटली असल्याचे माधवी मुक्ताला सांगते. 


सावनीचा जळफळाट 


सईसाठी एकत्र आले असल्याचे सांगत सावनी आपल्या प्रेमावर प्रश्न उपस्थित करत असल्याचे सागरच्या मनाला लागले आहे. त्यानंतर सागर हा मुक्ता आणि सईसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतो. हे पाहून सावनीचा जळफळाट होतो. त्यावर हर्षवर्धन हा सागरला टोमणा मारतो आणि लवकरच तो उद्धवस्त होणार असल्याचे सांगतो. 


पाहा व्हिडीओ :  आजच्या एपिसोडमध्ये काय पाहणार?