दहा वर्षांपूर्वी हिंदी मालिका विश्वातील एक दमदार सिरीयल म्हणून समोर आलेली बडे अच्छे लगते है ही मालिका आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येणार आहे. राम कपूर आणि साक्षी तंवर या कलाकारांची मुख्य भूमिका असणारी ही सिरीयल 2011 मध्ये सुरू झाली होती. तब्बल तीन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. राम आणि प्रिया यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस चांगलीच उतरली होती. 2014 मध्येही मालिका संपली पण या सिरीयलच्या चाहत्यांना आता एक गुड न्यूज मिळणार आहे. 'बडे अच्छे लगते है' ही सिरीयल आता पुनर प्रदर्शित केली जाणार आहे. नुकताच या सिरीयलचा प्रोमो सोनी टीव्हीच्या ऑफिशीयल पेजवरून शेअर करण्यात आलाय. नेटकऱ्यांचा या प्रोमोलाही भरभरून प्रतिसाद मिळत आहे. 


सोनी टीव्हीने प्रसारित केला प्रोमो


सोनी टीव्हीने बडे अच्छे लगते है या मालिकेचा प्रोमो आपले इंस्टाग्राम पेजवर शेअर केलाय. या प्रोमोमध्ये राम कपूर आणि साक्षी तंवर दिसत आहेत. राम आणि प्रियाची जोडी भाजी मार्केटमध्ये एकत्र भाजी  घेताना या प्रोमोमध्ये दिसत आहे. यामध्ये भाजीवाल्याला कोथिंबीरची जुडी मागणाऱ्या प्रियाला राम ने दिलेलं प्रेमळ उत्तर चांगलंच भावलं आहे. ही मालिका मध्येच न थांबवण्याचे विनंती ही या मालिकेच्या चाहते कमेंट सेक्शनमध्ये करत आहेत. 


 






कधीपासून पाहता येणार मालिका? 


बडे अच्छे लगते है ही मालिका सोनी टीव्हीवर 11 नोव्हेंबर पासून रात्री 8.30 वाजता दाखवण्यात येणार आहे. पूर्वीचीच मालिका पुनर्प्रदर्शित केली जाणार असल्याने चाहत्यामध्ये उत्सुकता आहे. राम आणि प्रियाची जोडी दहा वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या मनात कायम असल्याचे दिसून येत आहे.


काय आहे बडे अच्छे लगते है ची गोष्ट?


'बडे अच्छे लगते हैं'ची कथा राम आणि प्रियाभोवती फिरणारी आहे. या दोघांचे या मालिकेत बळजबरीने लग्न झालेले असते. ते ददोघेही एकमेकांपासून खूप वेगळे आहेत. मात्र, एकत्र राहिल्यानंतर दोघेही एकमेकांना समजून घेतात आणि प्रेमात पडतात. हा शो एक परिपक्व प्रेमकथा आहे. ज्याची दहावर्षांपूर्वी सुरु झालेली कथा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.