Bigg Boss 18:  बिग बॉसमध्ये एरवी एकमेकांच्या अंगावर आरोप करत चिखल फेक करणाऱ्या स्पर्धकांमध्ये आता दिवाळीच्या मुहूर्तावर खरोखरच चिखलफेक पाहायला मिळणार आहे. बिग बॉस 18 चा 'वीकेंड का वार' चा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यात घरातील सदस्यांना समोर बसवत बिग बॉसने घरातील अशा काही चर्चेतील जोड्यांची नावे घेतली. ज्यांच्या नात्यात खोट असेल त्याच्या डोक्यावर चिखलाने भरलेली बादली ओतण्यात येणार आहे. 


कलर्स टीव्ही ने घरातील या चिखल फेकीचा प्रोमो समोर आणला आहे. यात करणविरने इशाच नाव घेत रजत आणि तिच्यातल्या नात्यावर बोट ठेवत तिच्यावर बादली भरून चिखलाच पाणी टाकलं. शिल्पा शिरोड करणे अविनाश चे नाव घेत त्याला immature म्हटला आहे. विव्हियन आणि अविनाश ला शेजारी बसवल्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये अविनाशच त्या नात्यातली खोट असल्याचं शिल्पा शिरोडकर यांनी सांगितलं. आणि त्याच्या वर चिखलाच पाणी ओतलं. 


अविनाश सह विवियनही त्यांच्या नात्यावर बोलला...


अविनाश आणि व्हीव्हियन यांच्यात चांगली मैत्री बिग बॉसच्या घरात दिसत आहे. यांच्या नात्यात अविनाश खोटा असल्याचं सांगितल्यानंतर त्यांनाही त्यावर चोख उत्तर दिल्याचं दिसलं. विज्ञान आणि माझ्यातलं नातंही तुम्ही स्वीकारायला तयार नाही असं मजेत तो म्हणाला. विव्हियननेही घरातल्या सगळ्यांना सल्ला दिला किया फालतूच्या गोष्टी थांबवा आणि यासाठी या घरात आला ते करा. नंतर त्यानं करणवीर आणि शिल्पा शिरोडकर यांचा मधला चिखल हा करणविरत असल्याचा सांगत त्याच्यावर चिखलाची बादली ओतली. 


 






अविनाशच्या कुठल्याही बोलण्याला शिल्पाजी फसतात 


अविनाशच्या गोड गोड गोल गोल बोलण्याला शिल्पा शिरोडकर या कायमच फसतात. जे काही खोटं नाटक त्यांच्यासमोर बोलतो त्यावर त्या विश्वास ठेवतात. त्याला खरं मानतात. असा आरोप करत विवियनने करणवीरच्या डोक्यात चिखलाची बादली ओतल्याचे दिसले.