Monika Bhadoriya: असित मोदी यांचा 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta ka ooltah chashmah) हा शो गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. या शोमधील अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवालने असित मोदीविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करून अनेक धक्कादायक खुलासे केले होते. आता 'तारक मेहता' कार्यक्रमामध्ये 'बावरी' ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका भदौरिया हिनेही एका मुलाखतीत या शोच्या सेटवरील 'निगेटिव्ह' वातावरणाबद्दल सांगितले आहे.
एका मुलाखतीत मोनिका भदोरिया सांगितले की, “मी अनेक कौटुंबिक संकटांचा सामना केला आहे. मी माझी आई आणि आजी या दोघींना गमावले आहे. त्या दोघी माझ्या आयुष्याच्या आधारस्तंभ होत्या. त्या काळात मी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमध्ये करत होतो, ज्यामुळे मला टॉर्चर झाले होते.'
मोनिकाने पुढे सांगितले की,"तारक मेहता का उल्टा चष्माच्या सेटवरील प्रत्येकाच्या वागण्याने आणि कमेंट्समुळे मला इतके दुःख झाले की, मला शोसाठी काम करण्याची इच्छा होत नव्हती माझ्या आई-वडिलांना माझ्या शोच्या सेटवर आणणे हे माझे स्वप्न होते, पण सेटवरील वातावरण पाहून मी ठरवले की मी माझ्या आई-वडिलांना कधीही सेटवर येण्यास सांगणार नाही."
"पण जेव्हा माझी आई आजारी होती. तेव्हा मला वाटले की, मी तिला सेटवर आणावे आणि मी कुठे काम करतो ते तिला दाखवावे, परंतु ते अशक्य होते. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेच्या सेटवरील वातावरणानं मला शो सोडण्यास भाग पाडले. असे अनेक लोक आहेत जे पैशासाठी काम करत आहेत. पैसा महत्त्वाचा आहे, पण स्वाभिमानापेक्षा जास्त नाही." असंही मोनिकाने सांगितले.
2019 मध्ये मोनिकानं तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो सोडला. त्यानंतर अभिनेत्री नवीना वाडेकरनं या मालिकेत बावरी ही भूमिका साकारली.
28 जुलै 2008 रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: