Priya Ahuja Rajda On Asit Modi: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या शोमधील रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवालनं (Jennifer Mistry Bansiwal) असित मोदी आणि मालिकेच्या टीममधील इतर दोन व्यक्तींवर गंभीर आरोप केले होते. जेनिफर मिस्त्री बंसीवालनं असित मोदी, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे प्रोजेक्ट हेड सोहिल रमानी आणि एग्झीक्युटिव्ह प्रोड्यूसर जतिन बजाज यांच्यावर लैंगिक छळाचा (Sexual harassment) आरोप केला. त्यानंतर या शोमध्ये बावरीची भूमिका साकारणाऱ्या मोनिका भदौरियानेही असित मोदीने तिची कारकीर्द बरबाद करण्याची धमकी दिल्याचा दावा केला. आता या शोमध्ये रिटा रिपोर्टरची भूमिका साकारलेल्या प्रिया आहुजा हिने या सर्व प्रकरणांवर प्रतिक्रिया देत असित मोदींवर काही आरोप केले आहेत.
काय म्हणाली प्रिया आहुजा?
एका मुलाखतीमध्ये प्रिया अहुजानं सांगितलं की, तिनं दिग्दर्शक मालव राजदासोबत लग्नगाठ बांधल्यानंतर असित मोदी आणि मालिकेच्या टीमचं तिच्यासोबतचं वागणं बदललं होतं. तिने असा दावा केला की, तिला अन्यायकारक वागणूक दिली गेली आणि तारक मेहता का उल्टा चष्माच्या काही कलाकारांना मानसिक छळ झाला.
प्रिया पुढे म्हणाली की, मालवशी तिचं लग्न झाल्यानंतर तिचा शोमधील ट्रॅक कमी झाला. प्रियाने खुलासा केला की, तिने असित मोदींना शोमधील त्याच्या ट्रॅकबद्दल विचारण्यासाठी अनेक वेळा मेसेज केले परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अभिनेत्री म्हणाली की तिने तिच्या भूमिकेबद्दल स्पष्टता येण्यासाठी सोहिल रमाणी यांना मेसेज देखील पाठवला, परंतु तो ही प्रयत्न व्यर्थ गेला.
28 जुलै 2008 रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: