Dilip Joshi: तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फेम अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi) यांचा मुलगा  ऋत्विक याचा नुकताच विविह सोहळा संपन्न झाला. सोमवारी दिलीप  यांचा मुलगा ऋत्विकने त्याची गर्लफ्रेंड उन्नती गालासोबत लग्न केले.  ऋत्विक आणि उन्नती यांच्या  लग्नाचे अनेक व्हिडीओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दिलीप जोशी यांची सून उन्नती गाला हिच्याबद्दल जाणून घ्या...


कोण आहे दिलीप जोशी यांची सून उन्नती गाला?


ऋत्विकची पत्नी म्हणजेच उन्नती गाला ही एक अभिनेत्री आहे आणि ती गुजराती कुटुंबातील आहे. उन्नती ही गुजराती थिएटर आर्टिस्ट आहे. तिनं गुजराती नाटकांमध्ये काम केलं आहे. दिलीप जोशी यांचा मुलगा ऋत्विक जोशी हा देखील अभिनेता आहे. धमाका या चित्रपटात त्यानं काम केलं होतं. तो एक पटकथा लेखक देखील आहे. त्याने अनेक प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे.


दिलीप जोशी यांच्या मुलाच्या लग्नाला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या स्टारकास्टही हजेरी लावली होती. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दयाबेन ही भूमिका साकारणाऱ्या दिशा वकानी यांनी देखील  ऋत्विक आणि उन्नती यांच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. 






दिलीप जोशी यांनी 'मैने प्यार किया',  'वन 2 का 4', 'ढूंढते रह जाओगे', 'वॉट्स योर राशि', 'खिलाड़ी 420', 'हमराज' आणि 'फिराक' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच त्यांनी  'दो और दो पांच', 'हम सब बाराती', 'कोरा कागज' आणि 'दाल में काला' या टिव्ही शोमध्ये देखील काम केले आहे. पण 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली आहे.


 28 जुलै 2008  रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.


संबंधित बातम्या:


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : आलिशान बंगला अन् महागड्या गाड्या; 'तारक मेहता...' मालिकेतील जेठालाल खरचं कोट्यवधींचा मालक आहे? दिलीप जोशींनी सांगितलं सत्य