Dilip Joshi On Rumours Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : दिलीप जोशी (Dilip Joshi) गेल्या अनेक वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील जेठालालच्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्याचा अभिनय आणि विनोदाचं टायमिंग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. दीलीप जोशी यांच्याकडे आलिशान बंगला आणि महागड्या गाड्या असल्याच्या बातम्या येत होत्या. आता त्यांनी यावर मौन सोडलं आहे.
आलिशान बंगला आणि महागड्या गाड्यांचं दिलीप जोशींनी सांगितलं सत्य
आलिशान बंगला आणि महागड्या गाड्यांच्या बातम्यांवर दीलीप जोशी यांनी अखेर मौन सोडलं आहे. एका मुलाखतीदरम्यान ते म्हणाले,"आजकाल लोक लक्ष वेधून घेण्यासाठी काहीही लिहितात. माझ्या नसलेल्या संपत्तीबद्दल अनेकांनी वेगवेगळ्या बातम्या लिहिल्या आहेत. माझ्याकडे ऑडी Q7 आहे असे म्हणाले आहे. मी त्यांना म्हणालो, मला पण सांग भाऊ कुठे आहे? मी चालवीन". एकाने लिहिले की,"माझ्याकडे स्विमिंग पूल असलेलं घर आहे. मी म्हणालो की,"मुंबईत स्विमिंग पूल असलेलं घर मिळालं तर यापेक्षा मोठं काय असेल".
'या' कारणाने जेठालालने नाकारली 'कॉमेडी सर्कस'ची ऑफर
दिलीप जोशी यांच्याकडे 2007 साली काम नव्हते. ते बेरोजगार होते. दरम्यान घर चालवण्यासाठी पैसे कमावणं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. त्यावेळी 'कॉमेडी सर्कस'मध्ये काम करण्यासाठी त्यांना विचारणा झाली होती. पण तरीही त्यांनी ही ऑफर नाकारली होती. ते म्हणाले,"कॉमेडी सर्कस'मधील विनोद चांगल्या दर्जाचे नसतात. त्यामुळे मी ही ऑफर नाकारली. त्यानंतर काही दिवसांनी मला 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) काम करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर ते रातोरात स्टार झाले.
दिलीप जोशी यांच्या सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Dilip Joshi Movies)
दिलीप जोशी यांनी 1989 मध्ये 'मैने प्यार किया' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात केली होती. यानंतर त्याने 'वन 2 का 4', 'हम आपके है कौन' आणि 'फिर भी दिल है हिंदुस्तानी'सह अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.
संबंधित बातम्या