Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Serial Latest Update : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. गेल्या 15 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता ही मालिका रोमॅंटिक वळणावर आली आहे. मालिकेत टप्पू सोनूला कधी प्रपोज करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. पण प्रेक्षकांची ही प्रतीक्षा अखेर संपणार आहे. मालिकेच्या आगामी भागात टप्पू सोनूला प्रपोज करणार आहे. 


'तारक मेहता का उल्टा चष्मा' रोमॅंटिक वळणावर


'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेचे चाहते गेल्या काही वर्षांपासून दयाबेनच्या परत येण्याची आणि टप्पू-सोनूच्या प्रेमाची आतुरतेने वाट पाहत होते. टप्पू आणि सोनूने एकत्र यावं अशी प्रेक्षकांची इच्छा होती. मात्र भिडे आता टप्पू आणि सोनूच्या नात्याला ग्रीन सिग्नल देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टप्पू सोनूला लाल रंगाचं गुलाब देऊन प्रपोज करताना दिसत आहे. टप्पूच्या प्रेमाचा सोनू स्वीकार करणार तेवढ्यातच भिडे येऊन हा सगळा प्रकार थांबवतो आणि त्या दोघांना घेऊन जेठालालकडे जातो. 






तप्पूने सोनूला प्रपोज केल्यामुळे भिडेला खूप राग आला आहे. पण आत्माराम भिडे टप्पू आणि सोनूचं नातं स्वीकार नसल्याने जेठालाल आणि बापूजी मात्र हैरान झाले आहेत. त्यानंतर जेठालाल भिडेला म्हणतो की,"तू बिनदास्त आमच्यासमोर सोनूला प्रपोज कर... मी बघतोच भिडे तुला कसं थांबवतो". 


'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेहमीप्रमाणे आतादेखील भिडे स्वप्न बघत असेल, असा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर दुसरीकडे काही मंडळींनी मात्र मालिकेचा टीआरपी कमी झाल्याने निर्मात्यांनी हा ट्वीस्ट आणला आहे, असं म्हटलं आहे. 


'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून आजही या मालिकेची क्रेझ कायम आहे. दयाबेन, जेठालाल, पोपटलाल, बबिता जी, अय्यर, भिडे अशी या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. आता या मालिकेत पुन्हा एकदा रोमॅंटिक ट्रॅक सुरू झाल्याने मालिकेचा टीआरपी आणखी वाढण्याची शक्यता आहे.


संबंधित बातम्या


TMKOC : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' बंद होणार? रिटा रिपोर्टरने दिली महत्त्वाची माहिती