Shailesh Lodha : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) सध्या प्रचंड चर्चेत आहे. यामध्ये 'मेहता साहब' ही भूमिका साकारणारे अभिनेता शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी मालिका सोडली असल्याच्या चर्चांनी जोर पकडला आहे. असे म्हटले जात आहे की, शैलेश निर्मात्यांवर नाराज आहेत आणि त्यांनी शूटिंगला येणे देखील बंद केले आहे. दरम्यान, शैलेश लोढा यांच्या फीबाबत देखील जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय मीडिया रिपोर्ट्समध्ये त्यांच्या संपत्तीचा खुलासा होत आहे.


मालिकेतच नाही, तर खऱ्या आयुष्यातही शैलेश एक कवी आहेत. शैलेश लोढा यांना अभिनयासोबतच कविता लिहिण्याचीही आवड आहे. त्याचबरोबर तो अनेक शोमध्ये होस्ट म्हणूनही दिसले आहे. ते स्वतः लेखकही आहेत, त्यामुळे अभिनयातही त्यांची पात्राची समज खूप चांगली आहे. शैलेश अनेकदा त्याच्या कविता सोशल मीडियावर शेअर करत असतात. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमध्ये ते ‘तारक मेहता’ ही भूमिका साकारतात. या शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी ते भरपूर फी आकारतात. कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक असणाऱ्या शैलेश यांना महागड्या गाड्यांचीही आवड आहे.


शैलेश लोढा यांची फी आणि नेट वर्थ


अभिनेता शैलेश लोढा 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या प्रत्येक एपिसोडसाठी 1 लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारतात. शैलेश मालिका आणि इतर कार्यक्रमांतूनही लाखोंची कमाई करतात. अनेक कविसंमेलनातही ते दिसतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याची एकूण संपत्ती 3 कोटी रुपये आहे. पत्नी स्वाती आणि मुलगी स्वरासोबत ते मुंबईस्थित त्यान्ह्या घरात राहतात. शैलेश लोढा यांच्याकडे Audi, Mercedes' Benz E350D सारख्या लक्झरी गाड्यांचा संग्रह आहे.


'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमध्ये शैलेश यांची एन्ट्री कशी झाली, हे प्रत्येकालाच जाणून घ्यायचे आहे. एकेकाळी शैलेश लोढा 'वाह क्या बात है' कवी संमेलनाचे आयोजन करायचे. या कार्यक्रमातच त्यांची भेट शोचे निर्माते असित कुमार मोदी यांच्याशी झाली. इथेच असित यांनी त्यांना या शोची ऑफर दिली आणि शैलेशनेही लगेच होकार दिला.


हेही वाचा :