Swayamvar Mika Di Vohti : मिका सिंह (Mika Singh) हा लोकप्रिय गायक असून त्याची अनेक गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मिका सिंहचा 'स्वयंवर मीका दी वोटी' (Swayamvar Mika Di Vohti) या कार्यक्रम गेल्या महिन्यापासून चर्चेत होता. आता 19 जूनपासून प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. मिकाचे चाहतेदेखील या कार्यक्रमासाठी उत्सुक आहेत. 


जोधपूरमध्ये होणार स्वयंवर


मिका सिंह 'स्वयंवर मीका दी वोटी' या कार्यक्रमासाठी उत्सुक आहे. मिका सिंहचे स्वयंवर जोधपूरमध्ये होणार आहे. मिका सिंहचे स्वयंवर थाटामाटात होणार आहे. सोशल मीडियावर मिका सिंहच्या स्वयंवराचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 14 मे रोजी मिका सिंहचा खास मित्र कपिल शर्मादेखील मिका सिंहच्या स्वयंवरासाठी जोधपूरला गेला होता. लवकरच मिका सिंहच्या बॅचलर्स पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे. 


मिकाला जोडीदार शोधण्यासाठी अनेक सेलिब्रिटी करणार मदत


'स्वयंवर मीका दी वोटी' हा कार्यक्रम 19 जूनपासून स्टार भारतवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मिकाला जोडीदार शोधण्यासाठी अनेक सेलिब्रिटी मदत करताना दिसणार आहेत. मीकाचे 'मीका दी वोटी' हे गाणं सध्या चर्चेत आहे. या गाण्याचे बोल मिकाने लिहिले असून संगीतबद्धदेखील मिकानेच केलं आहे. मिकाचे ग्रॅंड स्वयंवर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 




12 मुलींमधून मिका करणार एकीची निवड


स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमात 12 मुली सहभागी होणार आहेत. 45 वर्षीय मिका सिंह 12 मुलींमधून एकीची प्रेयसी म्हणून निवड करणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातील विविध कानाकोपऱ्यातून मुली आल्या होत्या. 12 मुलींमधून मिका जोडीदार म्हणून कोणाची निवड करणार हे पाहणं मनोरंजक असणार आहे.


संबंधित बातम्या


Swayamvar Mika Di Vohti : मिका सिंह जोडीदार म्हणून कुणाची निवड करणार? लवकरच 'स्वयंवर मीका दी वोटी' कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला


Swayamvar Mika Di Vohti : कोट्यवधींची संपत्ती, महागड्या गाड्यांचे कलेक्शन! ‘स्वयंवर’ रचणाऱ्या मिकाचं नेटवर्थ माहितेय का?