Yog Yogeshwar Jai Shankar : शिरीष लाटकर (Shirish Latkar) लिखित 'योगयोगेश्वर जय शंकर' Yog (Yogeshwar Jai Shankar) ही नवी मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेत बालशकंराची भूमिका साकारणाऱ्या आरुष बेडेकरचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. दरम्यान 95 वर्षीय एका भक्ताने 'योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेच्या सेटला भेट दिली आहे. तसेच बालशंकराचीदेखील भेट घेतली आहे.
'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेद्वारे सद्गुरु श्री शंकर महाराज यांचा जीवन प्रवास उलगडून दाखवला जात आहे. श्री शंकर महाराज यांच्या बालपणापासूनच श्री स्वामी समर्थांचा त्यांच्यावर कृपाशीर्वाद होता तसाच कृपाशीर्वाद शंकर महाराजांचा त्यांच्या भक्तांवर आहे, त्यापैकी एक भक्त म्हणजे सोलापूरमधील रघुनाथ हरिभाऊ कडलास्कर (पेंटर काका). रघुनाथ कडलास्कर यांना वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षांपासून ते वयाच्या वीस वर्षांपर्यंत त्यांना शंकर महाराजांचा प्रत्यक्ष सहवास सोलापूरमध्ये शुभराय मठात आणि जक्कल मळ्यात लाभला.
महाराजांच्या कृपाशीर्वादाने रघुनाथ हरिभाऊ कडलास्कर यांचे आयुष्य भक्तिमय झाले. 1947 साली धनकवडी येथे महाराजांनी समाधी घेतली. त्यावेळी पेंटर काकांचे वय वीस वर्ष होते. आज पेंटर काकांचे वय 95 वर्ष असून ते 'योगयोगेश्वर जय शंकर' ही मालिका दररोज पाहतात. त्यामुळे त्यांनी 'योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेच्या सेटला भेट दिली. दरम्यान बालशंकरच्या भूमिकेत आरुषला पाहून त्यांना गहिवरून आले.
पेंटर काकांनी महाजन विषयी प्रत्यक्ष भेटी चे काही अनुभव सर्वांना सांगितले. दरम्यान सेटवरील वातावरण भक्तीमय होऊन गेले होते. त्यातून सद्गुरु श्री शंकर महाराजांचे त्यांच्या भक्तांवर असलेले अतोनात प्रेम,आणि कृपादृष्टी दिसून आली. शंकर महाराज यांचा बालपणापासून ते महानिर्वाणापर्यंतचा प्रवास 'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
शंकर महाराजांचे भक्तगण त्यांना साक्षात शंकराचाच अवतार मानतात. 'मैं कैलाश का रहने वाला हू','मेरा नाम है शंकर' असं बोलत ज्यांनी अनेक पीडितांच्या दु:खांचे निवारण केले, ज्यांचा भक्तसमुदाय संपूर्ण जगात विखुरलेला आहे, महादेवाचा अंश जे आहेत, असे असंख्य भक्तांचे कैवारी 'शंकर महाराज' आहेत. एक सिद्ध आणि अवलिया सत्पुरुष शंकर महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित ही मालिका आहे.
संबंधित बातम्या