Mika Singh Networth : बॉलिवूड गायक मिका सिंह (Mika Singh) हा सध्या त्याच्या ‘स्वयंवर’ शोमुळे चर्चेत आला आहे. केवळ गाण्यासाठीच नाही तर, मिका त्याच्या लक्झरी लाईफस्टाईलमुळे देखील चर्चेत असतो. आपल्या गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या मिका सिंह याचे नेटवर्थदेखील कोट्यवधींमध्ये आहे. एक गाणं गाण्यासाठी मिका लाखो रुपये आकारतो. मिका सिंह पंजाबी गायक दिलेर मेहंदीचा धाकटा भाऊ आहे. मिकाचे खरे नाव अमर सिंह आहे. आपल्या आवाजाने आणि गाण्याने आपला एवढा दबदबा निर्माण केला आहे की, आज त्याची तगडी फॅन फॉलोइंग आहे.


मिका त्याच्या गाण्यांमुळे नेहमी चर्चेत असतोच, पण त्याहीपेक्षा ततो त्याच्या लक्झरी लाईफस्टाईलमुळे चर्चेत असतो. आलिशान घरांपासून ते महागड्या वाहनांपर्यंत अनेक लक्झरी वस्तू त्याच्या जीवनशैलीचा एक भाग बनल्या आहेत.


महागड्या गाड्यांची आवड!


रिपोर्ट्सनुसार, मिका सिंहकडे 35 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. ज्यामध्ये त्याचे अंधेरीतील आलिशान घर आणि आयलंडमधील लक्झरी घराचाही समावेश आहे. याशिवाय मिका सिंहला लक्झरी वाहनांचीही खूप आवड आहे. त्याच्याकडे पोर्शे पनामेरा (1.46 कोटी), हमर (80 लाख), लॅम्बोर्गिनी (3 कोटी), फोर्ड मस्टँग (76 लाख), मर्सिडीज जीएलएस (1.07 कोटी) आणि डॉज चॅलेंजर एसआरटी हेलकॅट (52 लाख) या सारखी अनेक महागडी वाहने आहेत.


कोट्यवधींचे नेटवर्थ


मिका सिंहला टी-सीरीजमधून वार्षिक 3 कोटी रुपये मानधन मिळते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती सुमारे 115 कोटी रुपये आहे. कधीकाळी अवघ्या 500 रुपयांत गाणं गाणारा मिका सिंह आज घडीला कोट्यवाढी रुपये कमावतो.  मिका सिंहने हे सर्व साध्य करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, त्यानंतर आज तो एका मोठ्या टप्प्यावर आहे.


लवकरच अडकणार लग्नबंधनात!


बॉलिवूड गायक मिका सिंह (Mika Singh) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. स्टार भारतच्या 'स्वयंवर: मिका दी वोटी' या शोमधून मिका आपली आयुष्यभराची जोडीदार निवडणार आहे. 'स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमात एकूण 12 मुली सहभागी होणार आहेत. 45 वर्षीय मिका सिंह 12 मुलींमधून एकीची निवड करणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातील विविध कानाकोपऱ्यातून मुली आल्या आहेत. 12 मुलींमधून मिका जोडीदार म्हणून कोणाची निवड करणार, हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे.


हेही वाचा :


Swayamvar Mika Di Vohti : मिका सिंह जोडीदार म्हणून कुणाची निवड करणार? लवकरच 'स्वयंवर मीका दी वोटी' कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला


Mika Singh Swayamvar : नॅशनल टीव्हीवर मिका सिंह रचणार स्वयंवर!


Happy Birthday Mika Singh : बॉलिवूडचा स्टार गायक, राखी सावंत चुंबन प्रकरणामुळे राहिला चर्चेत!