Swayamvar Mika Di Vohti :   प्रसिद्ध गायक मिका सिंहच्या (Mika Singh) गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळते. लवकरच मिका विवाहबंधनात अडकणार आहे. 'स्टार भारत'च्या 'स्वयंवर: मिका दी वोटी' (Swayamvar: Mika Di Vohti) या शोमधून मिका आपली आयुष्यभराची जोडीदार निवडणार आहे. कालपासून (19 जून) या कार्यक्रमाला सुरुवात झाली. काल  'स्वयंवर: मिका दी वोटी' या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीस आला. या एपिसोडचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मिकाच्या स्वयंवरात आलेल्या दोन मुलींमध्ये भांडण झालेलं दिसत आहे. 


'स्वयंवर: मिका दी वोटी' या कार्यक्रमामध्ये 12 मुलींनी सहभाग घेतला आहे. या मुलींमधील नीत आणि बुशरा यांच्यामध्ये स्वयंवराच्या पहिल्याच दिवशी भांडण झालं. या एपिसोडच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नीत ही बुशरा म्हणते, 'गेम ही नेहमी आपल्या लेव्हलच्या खेळाडूसोबत खेळावा.' यावर बुशरा म्हणते, 'मिका सिंह ट्रोफी नाहीये, इथे तू काय जिंकायला आणि हरायला आली आहे?' यावर नीत म्हणते, मी इथे कोणालाच माझा स्पर्धक मानत नाही. त्यानंतर बुशरा म्हणते, 'ये तो सच में सस्ती वाली कटरीना कैफ है' हे ऐकून मिका देखील थक्क होतो. बुशरा ही मुंबईमध्ये राहते. ती 24  वर्षाची आहे. तर नीत ही चंदीगडची आहे. या दोघींमध्ये मतभेद झाल्यानं आता मिकाच्या स्वयंवरामध्ये कोणते ट्वीस्ट येतील? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


पाहा व्हिडीओ:






'स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमात एकूण 12 मुली सहभागी होणार आहेत. 45 वर्षीय मिका सिंह 12 मुलींमधून एकीची निवड करणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातील विविध कानाकोपऱ्यातून मुली आल्या आहेत. 12 मुलींमधून मिका जोडीदार म्हणून कोणाची निवड करणार, हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. 12 मुलींपैकी मिका लग्नासाठी कोणत्या मुलीची निवड करेल? या प्रश्नाचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. मिका हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आहे. त्याच्या 'पार्टी तो बनती है', 'सुबह होने न दे', 'रानी तू मैं राजा' या गाण्यांमुळे मिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. 


हेही वाचा: