Mika Di Vohti : प्रसिद्ध गायक मिका सिंहच्या (Mika Singh) गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळते. लवकरच मिका विवाहबंधनात अडकणार आहे. स्टार भारतच्या 'स्वयंवर: मिका दी वोटी' या शोमधून मिका आपली आयुष्यभराची जोडीदार निवडणार आहे. ‘मिका दी वोटी’ (Swayamvar Mika Di Vohti) हा शो 19 जूनपासून रात्री 8 वाजता प्रसारित होणार आहे. हा शो प्रेक्षकांच्या भेटीस येण्याआधी शोमधील काही प्रोमो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या प्रोमो व्हिडीओमध्ये काही सेलिब्रिटी हे मिकाला लग्नाच्या आधी काही टिप्स देताना दिसत आहेत. या शोमध्ये कॉमेडियन कपिल शर्माने (Kapil Sharma) देखील हजेरी लावली होती. शोमध्ये कपिलनं मिकाचे कौतुक केले. हे ऐकून मिका भावूक झाला.              

  


व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की कपिल हा मिकाला म्हणतो, 'मिका ज्या मुलीसोबत लग्न करेल, ती मुलगी खूप लकी असेल. मिका हा सर्वांवर प्रेम करतो, मग विचार करा की हा त्यांच्या लाइफ पार्टनरवर किती प्रेम करेल. मिका मी तुझ्यासाठी मनापासून प्रार्थना करतो.' कपिलचं हे बोलणं ऐकून मिका भावूक होतो.  


पाहा व्हिडीओ:



मिका सिंहच्या 'स्वयंवर मीका दी वोटी'च्या प्रीमिअरला दलेर मेहंदी आणि कपिल शर्मा धमाल, मजा, मस्ती करताना दिसणार आहेत. नुकत्याच समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये दलेर मेहंदी म्हणतो आहे,"मिकाला डजनभर मुलं व्हावी." 


मिकाच्या या  स्वयंवर शोमध्ये 12 मुली सहभागी होणार आहेत. देशातील विविध शहरातील मुली या शोमध्ये सहभाग घेणार आहेत. 12 मुलींपैकी मिका लग्नासाठी कोणत्या मुलीची निवड करेल? या प्रश्नाचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. प्रेक्षक या कार्यक्रमाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.


मिकानं 150 मुलींना दिला होता नकार


मुलाखतीमध्ये मिका म्हणाला, 'मला 20 वर्षामध्ये 150 मुलींनी लग्नासाठी प्रपोज केलं. पण कधीच हिंमत नाही झाली की त्या मुलींना घेऊन माझ्या भावाकडे लग्नची बोलणी करण्यासाठी भेटावे. त्यामुळे मी त्या मुलींना लग्न करण्यास नकार दिला. पण आता मी स्वयंवर करणार आहे. '  


हेही वाचा :