Sur Nava Dhyas Nava Winner Gopal Gawande : 'सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा' (Sur Nava Dhyas Nava) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम असून नुकताच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला आहे. गोपाळ गावंडे (Gopal Gawande) या पर्वाचा विजेता ठरला आहे. महागायकावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


गोपाळ गावंडे ठरला 'सूर नवा ध्यास नवा'चा महागायक


'सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा' या सहाव्या पर्वाचा ग्रँड फिनाले दिमाखात पार पडला. 'आवाज तरुणाईचा' या पर्वात अकोल्याचा गोपाळ गावंडे विजेता ठरला. कार्यक्रमाच्या उल्लेखनीय प्रवासात, गोपाळने उत्कृष्ट सादरीकरण व अपवादात्मक कामगिरी पाहायला मिळाली. स्पर्धेतील त्याच्या उल्लेखनीय प्रवासामुळे तो या पर्वाचा ‘महागायक’ ठरला.






'सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा' या पर्वात जुनी गाणी नव्या अंदाजात ऐकायला मिळाली. या नव्या प्रयोगाला प्रेक्षकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. गोपाळ गावंडे याचा अतुलनीय आत्मविश्वास आणि संपूर्ण पर्वातील अपवादात्मक कामगिरीमुळे प्रेक्षकांच्या प्रचंड पाठिंब्यामुळे त्याला राजगायकाचा मान मिळाला. 


संस्मरणीय ठरलं 'सूर नवा ध्यास नवा'चं 'हे' पर्व


'सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा' हे पर्व संगीतातील वैविध्य आणि प्रतिभेची समृद्धता साजरी करणारे व्यासपीठ आहे. गोपाळ गावंडेचा विजय त्याचे समर्पण, उल्लेखनीय कामगिरी आणि प्रेक्षकांच्या प्रचंड पाठिंब्याचा पुरावा आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या स्पर्धकांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने प्रेक्षकांना भुरळ घातली, त्यामुळे खरोखरच हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.


विजेतेपद पटकावल्यानंतर गोपाल गावंडे म्हणाला,"सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा' या कार्यक्रमात मी स्पर्धक म्हणून सहभागी झालो होतो. पण या पर्वाचा मी विजेता होईल, असं मला कधीच वाटलं नाही. हा तीन महिन्यांचा प्रवास खूप काही शिकवणारा होता. आता हा प्रवास पुन्हा मिळणार नाही, याची खंत कायम राहिल. या प्रवासात मिळालेला आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही". 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्याला माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), नाना पाटेकर (Nana Patekar) आणि मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) या कलाकारांनी हजेरी लावली होती. 


संबंधित बातम्या


New Year 2024: थर्टी फर्स्टची रात्र असणार खास; घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी