एक्स्प्लोर

Superstar Singer 2 Winner: दणक्यात पार पडला ‘सुपरस्टार सिंगर 2’चा महाअंतिम सोहळा, मोहम्मद फैज ठरला विजेता!

Mohammad Faiz : सोनी टीव्हीच्या या सिंगिंग रिअॅलिटी शो ‘सुपरस्टार सिंगर 2’ला अखेर तीन महिन्यांच्या तगड्या स्पर्धेनंतर आपला विजेता मिळाला आहे.

Superstar Singer 2 Winner: छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय शो ‘सुपरस्टार सिंगर 2’चा (Superstar Singer 2) महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला आहे. स्पर्धक मोहम्मद फैज (Mohammad Faiz) याने या पर्वाची ट्रॉफी जिंकली आहे. सोनी टीव्हीचा सिंगिंग रिअॅलिटी शो ‘सुपरस्टार सिंगर 2’ला अखेर तीन महिन्यांच्या तगड्या स्पर्धेनंतर आपला विजेता (Superstar Singer 2 Winner) मिळाला आहे. जोधपूरच्या मोहम्मद फैजने या शोचे विजेतेपद जिंकत लोकांच्या प्रेमासोबत 15 लाख रुपये बक्षीस म्हणून जिंकले आहेत. फैज, मणि, प्रांजल बिस्वास, आर्यनंद आर बाबू, ऋतुराज आणि साईशा गुप्ता हे या शोच्या टॉप 6 फायनलिस्टमध्ये सामील होते.  महान्तिं सोहळ्यात या स्पर्धकांमध्ये चुरस पाहायला मिळाली.

मोहम्मद फैज हा ‘इंडियन आयडॉल 12’ची स्पर्धक अरुणिता कांजीलालच्या टीममधून होता. ‘इंडियन आयडॉल 12’चे विजेतेपद अरुणिता जिंकू शकली नसली, तरी तिने मोहम्मद फैज याच्या माध्यमातून आपले जिंकण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

टॉप 6 फायनलिस्टमध्ये रंगली चुरस

‘सुपरस्टार सिंगर 2’च्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचलेल्या टॉप 6 फायनलिस्टमध्ये पवनदीप राजनच्या टीमचे 2 स्पर्धक साईशा आणि प्रांजल यांचाही समावेश होता. तर, मणी आणि ऋतुराज हे सलमान अलीच्या टीममधून होते. आर्यनंद हा मोहम्मद दानिश यांच्या टीममधून होता. 14 वर्षीय मोहम्मद फैज (Mohammad Faiz) या सगळ्यांना पराभूत करत शोचा विजेता ठरला आणि ट्रॉफीसह त्याने 15 लाखांचे रोख बक्षीसही जिंकले. तर, मणीला या पर्वाचा उपविजेता घोषित करण्यात आले. त्याला पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

जिंकली प्रेक्षक आणि परीक्षकांची मनं

विजेत्या मोहम्मद फैजला ट्रॉफीसोबतच 15 लाखांचा धनादेशही मिळाला आहे. ‘सुपरस्टार सिंगर 2’चा हा विजेता आपल्या बक्षीसाची रक्कम पालकांना सुपूर्द करणार आहे. मोहम्मद फैज याला ‘सुपरस्टार सिंगर 2’चे परीक्षक-गायक हिमेश रेशमिया यांनी 'युथ सेन्सेशन' ही पदवी देखील दिली होती. प्रत्येक एपिसोडमध्ये जोधपूरचा हा चिमुकला प्रतिभावान गायक परीक्षकांची आणि प्रेक्षकांची मने जिंकताना दिसला होता. शोमध्ये सहभागी झालेले सेलिब्रिटीही फैज (Mohammad Faiz) याच्या आवाजाने खूप प्रभावित झाले होते.

विजयानंतर फैज म्हणतो...

या शोदरम्यान अनेक सेलिब्रिटींनी त्याचे खूप कौतुक केले होते. आपल्या विजयानंतर पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत फैज म्हणाला की, जेव्हा माझं नाव विजेता म्हणून घोषित करण्यात आलं, तेव्हा माझ्या कुटुंबीयांच्या डोळ्यांत मी आनंदाश्रू पाहिले. मला या पर्वात अनेकांकडून कौतुकाचे आणि शिकवण बोल मिळाले. मी माझ्या या विजयाने हुरळून न जाता भविष्यात आणखी काय चांगले करता येईल, याकडे लक्ष देणार आहे.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 4 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

महत्त्वाच्या बातम्या

Amol Kolhe On Savitribai Jyotiba Phule Serial: TV वरुन गाशा गुंडाळला, पण युट्यूबर येताच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं; 'सावित्रीबाई जोतीराव फुले'बाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
'टीआरपीपेक्षा प्रेक्षकांचं प्रेम महत्त्वाचं...'; 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेबाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
Kushal Badrike On Marathi Movie Show In Theaters: आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही, कुशल बद्रिके हळहळला
आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही; कुशल बद्रिके हळहळला
Uma Hrishikesh Diagnosed With Endometriosis Shares Post: मासिक पाळीतल्या भयंकर वेदना, जडला गंभीर आजार अन् तातडीची शस्त्रक्रिया; मराठी अभिनेत्रीच्या आयु्ष्यात धक्कादायक वळण, इंडस्ट्री सोडून थेट परदेशात झाली शिफ्ट
मासिक पाळीतल्या भयंकर वेदना, जडला गंभीर आजार अन् तातडीची शस्त्रक्रिया; मराठी अभिनेत्रीच्या आयु्ष्यात धक्कादायक वळण
Star Pravah Halad Rusli Kunku Hasla Serial: स्टार प्रवाहवरची 'ही' मालिका वर्षभरातच गाशा गुंडाळणार, अभिनेत्री भावूक, सेटवरच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर करत म्हणाली...
स्टार प्रवाहवरची 'ही' मालिका वर्षभरातच गाशा गुंडाळणार, अभिनेत्री भावूक, सेटवरच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर करत म्हणाली...

व्हिडीओ

Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Embed widget