Nakuul Mehta : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांत मनोरंजन सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. नकुल मेहताने नुकतीच कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. अशातच त्याच्या कुटुंबियांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. नकुलची पत्नी जानकी मेहता आणि मुलगा सुफी मेहताला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
'बडे अच्छे लगते हैं' फेम नकुल मेहताच्या पत्नीने सूफीचे रुग्णालयातील फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सुफी सुपरमॅनच्या वेशभूषेत दिसत आहे. फोटो शेअर करत जानकीने एक भावनिक संदेशदेखील लिहिला आहे. सुफी सध्या 11 महिन्यांचा आहे.
बॉलिवूडला कोरोनाचा विळखा
अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रूंचाल तसेच अर्जुन कपूर, रिया कपूर, नोरा फतेही, मृणाल ठाकुर या कलाकारांना देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. एकता कपूरलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवूड अभिनेते प्रेम चोप्रांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे, सध्या ते लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत.
संबंधित बातम्या
Prem Chopra : बॉलिवूड अभिनेते प्रेम चोप्रांना कोरोनाची लागण, लीलावती रुग्णालयात दाखल
Pushpa Box Office : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'ने बॉक्स ऑफिसवर केली 300 कोटींची कमाई
83 Movie : कोरोनाचा 83 च्या कमाईवर परिणाम, लवकरच OTT वर प्रदर्शित होणार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha