Kitchen Kallakar : 'किचन कल्लाकार' हा नवीन कुकरी शो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या कुकरी शोचे प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. "आता भल्या भल्या कलाकारांची शिट्टी वाजणार आणि मनोरंजनाची चव वाढणार". म्हणत या कुकरी शो ची सुरुवात झाली होती. 'किचन कल्लाकार'च्या आगामी भागात नेतेमंडळी पदार्थ बनवताना दिसणार आहेत. 


'किचन कल्लाकार'च्या आगामी भागात पंकजा मुंडे, रोहित पवार आणि प्रणिती शिंदे दिसणार आहेत. या भागात महाराज म्हणजेच प्रशांत दामले या तिन्ही नेत्यांना महाराजांच्या आवडीचे पदार्थ बनवण्याचं आव्हान देणार आहेत. महाराजांच्या आवडीचे हे पदार्थ बनवताना नेतेमंडळींना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे. विसरलेले पदार्थ पेठेतून आणण्यासाठी काहीठिकाणी युती तर काहीवेळा खुर्चीसाठी सामना करावा लागणार आहे.





अनेक मजेदार किस्सेदेखील नेतेमंडळी ऐकवणार आहेत. पंकजा मुंडे यांची गटारी अमावास्येला काय फजिती झाली? प्रणिती शिंदे यांनी पायलट सारखी घोषणा कशी केली? रोहित पवार यांनी कार्यक्रमात एका खेळात खुर्चीचा त्याग  केला आणि मग काय गुगली टाकली? हे प्रेक्षकांना 'किचन कल्लाकार'च्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे. 


संबंधित बातम्या


Bollywood Upcoming Films : 'या' हिट सिनेमांचे सिक्वेल 2022 मध्ये होणार प्रदर्शित


Shahir Patthe Bapurao: प्रतिभाशाली तमाशा कलावंत शाहीर पठ्ठे बापूराव यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर


स्वप्नील जोशीचा ‘अश्वत्थ’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस; टीझर प्रदर्शित


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha