Sukh Mhanje Nakki Kay Asat Off Air : टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अनेक घडामोडी घडत असतात. अनेक जुन्या मालिका ऑफ एअर जातात आणि त्यांची जागा नवी मालिका घेते. गेल्या काही महिन्यातही अनेक मालिकांनी निरोप घेतला असून त्या जागी नव्या मालिका पाहायला मिळतात. टीव्ही चॅनच्या स्पर्धेत टीआरपीसाठी हा सर्व खेळ सुरु असतो. नव्या मालिकांमुळे चॅनलला टीआरपी वाढवण्यात मदत होते. झी मराठी, कलर्स मराठी आणि स्टार प्रवाह या सर्वच चॅनल्सने गेल्या काही महिन्यात जुन्या मालिका बंद करत नव्या मालिका सुरु केल्या आहेत. आता आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती आहे. स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते आणि लग्नाची बेडी यानंतर आता आणखी एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जात आहे.


स्टार प्रवाहवरील आणखी एक मालिका घेणार निरोप


स्टार प्रवाहवरील दोन मालिका आधीच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये आई कुठे काय करते आणि लग्नाची बेडी या मालिकांचा समावेश आहे. 22 नोव्हेंबरला आई कुठे काय करते मालिकेचा शेवटचा भाग दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर काही दिवसांनी लग्नाची बेडी ही मालिकाही प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आता आणखी एक मालिका ऑफ एअर जाणार आहे. त्यामुळे आता स्टार प्रवाहवरील तीन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.


चार वर्षांनंतर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' बंद होणार


'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. चार वर्षानंतर आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 2020 मध्ये ही मालिका सुरु झाली होती. कोठारे व्हिजन निर्मित ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मालिकेसह यातील कलाकारांनाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिका सुरुवातीपासून टीआरपीच्या शर्यतीत होती. सुरुवातीला ही मालिका टॉप 5 मध्ये होती, आताही या मालिकेचं टॉप 10 मधील स्थान कायम आहे. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.






 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


दिव्यांका त्रिपाठी अन् करण पटेलची केमिस्ट्री पुन्हा पाहायला मिळणार, एकता कपूरच्या नव्या मालिकेत एकत्र दिसणार