Divyanka Tripathi And Karan Patel New Show : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता करण पटेल यांच्या ऑनस्क्रिन जोडीने प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळवलं. दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल यांची 'ये हैं मोहोबते' ही मालिका लोकप्रिय ठरली. 'ये हैं मोहोबते' मालिकेतील रमन आणि इशिताची पात्र दोघांनी उत्तमरित्या साकारली. या दोघांची ऑनस्क्रिन जोडी प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरली होती. दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल यांच्या जोडीला अनेक वेळा फेवरेट जोडी अवॉर्डही मिळाले. दोघांनीही खट्याळपणा, मस्ती आणि तितकाच गंभीर अभिनय दाखवत प्रेक्षकांच्या मनात वेगळीच छाप पाडली. आता या जोडीच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. 

Continues below advertisement

प्रेक्षकांच्या लाडक्या ऑनस्क्रीन जोडीचं कमबॅक

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) आणि अभिनेता करण पटेल (Karan Patel) यांची जोडी पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता करण पटेल एका नव्या मालिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसण्याची शक्यता आहे. प्रेक्षकांची ही फेवरेट रिल जोडी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करताना दिसणार आहे. दिव्यांका आणि करण एकता कपूरच्या नवीन शोमध्ये एकत्र दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिव्यांका त्रिपाठी अन् करण पटेल एकत्र दिसणार 

मीडिया रिपोर्टनुसार, करण पटेलशी संबंधित सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. गॉसिप टीव्हीच्या रिपोर्टनुसार, करण पटेल एकता कपूरच्या आगामी शोमध्ये मुख्य भूमिका साकारण्यासाठी तयार आहे. तर दिव्यांका त्रिपाठी एकता कपूरच्या शोमध्ये पुन्हा एका दक्षिण भारतीय महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्री उर्वशी ढोलकिया खलनायकाच्या भूमिकेत एकता कपूरच्या नवीन शोचा भाग असू शकते.

Continues below advertisement

'फेवरेट कपल'ची केमिस्ट्री पुन्हा पाहायला मिळणार

दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल एकता कपूरच्या नवीन शोमध्ये एकत्र दिसणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टमध्ये समोर आली आहे. एकता कपूरचा हा नवीन शो सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण, एकता कपूरकडून याबद्दल अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्याशिवाय, दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल यांनी याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

एकता कपूरच्या नव्या मालिकेत एकत्र दिसणार

'ये है मोहब्बतें' मालिकेमध्ये दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. ही जोडी पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षक फार आतूर होते, आता चाहत्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे. काही दिवसांपूर्वी हे दोघे एकता कपूरच्या दिवाळी पार्टीत एकत्र दिसले होते, जे पाहून चाहत्यांचा उत्साह गगनाला भिडला होता. आता हे दोघे एकत्र येणार असल्याने चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Journey Trailer : 'जर्नी' चित्रपटाचा रहस्यमय ट्रेलर प्रदर्शित, अकल्पित प्रवासाची कथा उलगडणारा एक थरारक अनुभव