Actor Jayam Ravi Divorce : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता जयम रवी सध्या त्याचा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तामिळ अभिनेता जयम रवीने अलीकडेच सोशल मीडियावर पत्नी आरतीपासून घटस्फोटाची घोषणा केली. तेव्हापासून तो चर्चेत आहे. जयमने आता पत्नीसोबतचे फोटोही सोशल मीडियावरून हटवले आहेत. याशिवाय पत्नी आरतीविरोधात एफआयआरही नोंदवण्यात आल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये सांगितलं जात आहे.
पत्नीविरुद्ध एफआयआर दाखल
आता जयम रवीने एका मुलाखतीत घटस्फोटाच्या घोषणा आणि त्याचा वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. या लग्नात त्याला गुदमरल्यासारखं वाटू लागलं होतं, असं रवीने सांगितलं. इतकंच नाही तर जयम रवीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पत्नीसोबतचे सर्व फोटो डिलीट केले आहेत. त्याने पत्नीविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.
पत्नीने घराबाहेर काढल्याचा जयम रवीचा आरोप
अभिनेता जयम रवीने पत्नी आरतीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पत्नी आरतीने स्वत:च्याच घरातून हाकलून दिल्याचा आरोप जयम रवीने केला आहे. जयम रवीने अड्यार पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार नोंदवली आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्याने त्याच्या ईसीआर रोडवरील घरातून सामान परत मिळविण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांची मदत देखील मागितली होती.
"घरात नोकरालाही माझ्यापेक्षा जास्त मान"
मला नात्यात गुदमरल्यासारखं होत होतं. माझ्याच घरात माझ्या नोकरालाही माझ्यापेक्षा जास्त मान मिळत होता. मी आरतीच्या आईसाठी तीन चित्रपट केले. मला सांगण्यात आलं की, तिन्ही चित्रपट फ्लॉप ठरले. पण, नंतर मला कळलं की, सर्व चित्रपटांनी चांगली कमाई केली होती. माझ्या इंस्टाग्रामचं अकाऊंट आरती हाताळत होती. माझा फोन, माझे चॅट चेक करायची. मला माझ्याचं घरातून बाहेर काढलं. मी मुंबईत शिफ्ट झालो आहे. पण, जेव्हा कधी मला चेन्नईला जायचं असतं, तेव्हा मी हॉटेलमध्ये राहतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :