मुंबई : छोट्या पडद्यावर श्रीकृष्णाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता सौरभ जैन (Sourabh Raaj Jain). टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये एखादी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडलेल्या फारच कमी कलाकारांपैकी एक म्हणजे सौरव राज जैन. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध महाभारत मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका सौरव जैन याने साकारली होती. सौरवची ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात वेगळीच छाप पाडून गेली. सौरवने श्रीकृष्णाचं मनमोहक रुप प्रेक्षकांसमोर मांडलं.
श्रीकृष्णाच्या भूमिकेनं घराघरात पोहोचला
सौरभ राज जैन याने भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवली. या भूमिकेमुळे त्याला खूप पसंती मिळाली. 'देवों के देव महादेव' मालिकेमधील विष्णूची भूमिकादेखील प्रेक्षकांना खूप आवडली. यानंतर सौरभने 'महाकाली: अंत ही आरंभ' या टीव्ही मालिकेमध्ये भगवान शंकराची भूमिकाही साकारली. पण सौरभला खरी ओळख मिळाली ती महाभारत या मालिकेत भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारून. याचं भूमिकेनं त्याला प्रसिद्धी मिळवून दिली.
अभिनेता सौरभ जैनचा नवा अंदाज
सौरभ जैनचं वैयक्तिक आयुष्यही फारच चर्चेत राहिलं. सौरभ जैनची लव्ह स्टोरीही फारच फिल्मी आहे. सौरभ आणि रिद्धिमा यांची भेट नोएडा येथील लोबो डान्स अकादमीमध्ये झाली होती. हळूहळू दोघांची झाली आणि नंतर मैत्रीला प्रेमाचा रंग चढला. तीन वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2010 मध्ये सौरभ आणि रिद्धिमा यांनी गुपचुप लग्न केलं.
सौरभ जैनची पत्नी रिद्धिमा जैन एक अभिनेत्री आणि सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. रिद्धिमाला फिटनेस आणि डान्सचीही आवड आहे. सौरभलाही डान्सची खूप आवड आहे आणि ते दोघेही नच बलिए शोमध्ये एकत्र झळकले होते. 2017 मध्ये रिद्धिमा आणि सौरभ जुळ्या मुलांचे पालक झाले.
श्रीकृष्णाची भूमिका साकारणारा टीव्ही अभिनेता बनला न्यूज अँकर
सौरभ जैन सध्या टीव्ही शोपासून दूर दिसत आहे. सौरभ जैन आता छोट्या पडद्यापासून दूर असून न्यूज अँकर बनला आहे. सौरव झी न्यूजचा डीएनए शो होस्ट करताना दिसत आहे. त्याची बातम्या सादर करण्याची शैलीही खूप वेगळी आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :