एक्स्प्लोर

Ashok Saraf: संपूर्ण सभागृह अशोक मामांसमोर नतमस्तक; पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांचा सन्मान

अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे.

Ashok Saraf: प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना मराठी चित्रपटसृष्टी ही लाडानं 'मामा' असं म्हणते. अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयानं आणि उत्तर कॉमिक टायमिंगनं अशोक सराफ हे प्रेक्षकांची मनं जिंकतात. अशोक सराफ यांचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे. नुकताच झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रोमोमध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddarth Jadhav) हा अशोक सराफ यांचा हार घालून सन्मान करताना दिसत आहे. 

झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, सिद्धार्थ हा स्टेजवरुन खाली येऊन अशोक सराफ यांना फुलांचा हार घालतो. या प्रोमोमध्ये झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असलेले मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार भावूक झालेले दिसत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याच्या आणखी एका प्रोमोमध्ये अभिनेता सुबोध भावे हा अशोक सराफ यांच्याबद्दल बोलताना दिसत आहे. सुबोध म्हणतो,  'मराठी सिनेमा म्हणजे 'अशोक सराफ' जिथे काम करतात ती इंडस्ट्री. अशोक सराफ यांच्याबरोबर काम करण्याचं स्वप्न ही तर खूप लांबची गोष्ट झाली, मला फक्त त्यांना जवळून बघायची इच्छा होती. अशोक सराफ यांच्या कामतून आम्ही प्रेरणा घेतली. आमच्या सर्वांकडून अशोक सराफ यांना मानाचा मुजरा.' झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा 26 मार्च रोजी प्रेक्षक पाहू शकतात. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

अशोक सराफ यांचे चित्रपट 

आयत्या घरात घरोबा, आमच्या सारखे आम्हीच,आत्मविश्वास,नवरी मिळे नवऱ्याला,गंमत जंमत आणि अशी ही बनवाबनवी या चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनी काम केलं आहे. कोयला, सिंघम, करण अर्जुन यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील अशोक सराफ यांनी काम केलं. अशोक सराफ यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. ‘मी बहुरुपी’ या पुस्तकात अशोक सराफ यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ashok Saraf : अशोक सराफ असं काही बोलले की राज ठाकरे यांनी लावला डोक्यालाच हात

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Birari: 'लग्नानंतरची पहिली दिवाळी, नवीन घर अन् नवी मालिका'; यंदाची दिवाळी पूजा बिरारीसाठी खास, कारण..
'लग्नानंतरची पहिली दिवाळी, नवीन घर अन् नवी मालिका'; यंदाची दिवाळी पूजा बिरारीसाठी खास, कारण..
Sunil grover on Tukaram Mundhe: 'फूड के रंग उड गये...'; कपिल शर्माच्या शोमध्ये सुनील ग्रोव्हरची तुकाराम मुंढेंवर खास कविता; VIDEO व्हायरल
'फूड के रंग उड गये...'; कपिल शर्माच्या शोमध्ये सुनील ग्रोव्हरची तुकाराम मुंढेंवर खास कविता; VIDEO व्हायरल
Maharashtrachi Hasyajatra Director Sachin Goswami: गौरव मोरे, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार कोण सोडून गेल्यावर जास्त वाईट वाटलं? दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले...
गौरव मोरे, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार कोण सोडून गेल्यावर जास्त वाईट वाटलं? दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले...
Deepika Chikhaliya On Ramayana: 'सीता पहिली सिंगल मदर...', 'रामायण' मालिकेत सीता मातेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीचं थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
'सीता पहिली सिंगल मदर...', 'रामायण' मालिकेत सीता मातेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीचं थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
Embed widget