Shark Tank India Season 2: स्वत:चा व्यवसाय सुरू करणारे लोक त्यांच्या वेगवेगळ्या कल्पना घेऊन शार्क टँक इंडिया (Shark Tank India) या शोमध्ये येतात.  त्यामधील काही कल्पना या अतरंगी देखील असतात. छोट्या पडद्यावरील या कार्यक्रमाच्या  पहिल्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या कार्यक्रमाचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘शार्क टँक इंडिया 2’(Shark Tank India Season 2) या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे.


सोनी टीव्हीनं सोशल मीडियावर शार्क टँक इंडिया सीझन 2 चा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये एका महिला भाजी घेताना दिसत आहे. यावेळे तो भाजीवाला शार्क टँक ज्या स्टाईलनं भाजी विकताना दिसत आहे. आता पूर्ण भारताला समजेल व्यवसायाचे खरे मूल्य, ही टॅगलाइन देखील प्रोमोमध्ये दिसत आहे. या प्रोमोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. 


हे दोन शार्क्स कार्यक्रमात दिसणार नाहीत


शार्क टँक इंडिया या कार्यक्रमाच्या पाहिल्या सीझनमुळे चर्चेत असलेले अश्नीर ग्रोवर आणि ममाअर्थ कंपनीच्या सहसंस्थापक गझल अलग हे दोन शर्क्स दुसऱ्या सीझनमध्ये परीक्षक म्हणून सहभागी होणार नाहीत. 






नव्या शार्कची एन्ट्री


कार्यक्रमाच्या पहिल्या सीझन प्रमाणेच दुसऱ्या सीझनमध्ये देखील ‘शादी डॉट कॉम’ची  सह-संस्थापक अनुपम मित्तल,  ‘बोट’ कंपनीचे को सह-संस्थापक  अमन गुप्ता, ‘लेंस्कार्ट’ कंपनीचे संस्थापक पीयुष बंसल, 'शुगर कॉस्मेटिक्स' कंपनीच्या सह-संस्थापक विनीता सिंह आणि 'एमक्योर फार्मास्युटिकल्स'च्या कार्यकारी संचालक नमिता थापरही दुसऱ्या सीझनमध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडतील. कार देखो ग्रुपचे सह-संस्थापक आणि सीईओ अमित जैन यांची दुसऱ्या सीझनमध्ये एन्ट्री होणार आहे. 


शार्क टँक इंडिया या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनचा प्रोमो पाहिल्यानंतर आता प्रेक्षक या कार्यक्रमाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Entertainment News Live Updates 2 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!