Marathi Serial : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...


1. टीआरपीच्या शर्यतीत 'रंग माझा वेगळा' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे. 


2. 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे.


3.  टीआरपी लिस्टमध्ये 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे. 


4. 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका टीआरपी रिपोर्टनुसार चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.3 रेटिंग मिळाले आहे.


5. 'आई कुठे काय करते' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 6.2 रेटिंग मिळाले आहे.


6. 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.7 रेटिंग मिळाले आहे.  


7. टीआरपीच्या शर्यतीत 'स्वाभिमान' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.5 रेटिंग मिळाले आहे.  


8. 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.1 रेटिंग मिळाले आहे. 


9. नव्या स्थानावर 'अबोली' ही मालिका आहे. या मालिकेला 4.4 रेटिंग मिळाले आहे. 


10. 10. 'लग्नाची बेडी' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 3.6 रेटिंग मिळाले आहे.


'बिग बॉस मराठी' टीआरपीच्या शर्यतीत मागे


'बिग बॉस मराठी4'चं चौथं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडलं आहे. दरवर्षी हा कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांवर असतो. पण यंदा मात्र टीआरपीच्या शर्यतीत हा बहुचर्चित कार्यक्रम मागे पडला आहे. या कार्यक्रमाला 3.0 रेटिंग मिळाले आहे. तर रविवारच्या चावडीला 3.2 रेटिंग मिळाले आहे. 


संबंधित बातम्या


Gayatri Datar : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत गायत्री दातारची होणार एन्ट्री; मालिकेने घेतला सहा वर्षांचा लीप