Shark Tank India Judge : सध्या छोट्या पडद्यावरील  'शार्क टँक इंडिया' (Shark Tank India) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहेत.स्वत:चा व्यवसाय सुरू करणारे लोक त्यांच्या वेगवेगळ्या कल्पना घेऊयात  या  शोमध्ये येतात. या शोमधील परिक्षक हे शोमध्ये येणाऱ्या  व्यक्तींसोबत संवाद साधून त्यांच्या आयडिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. जर त्या व्यक्तीची कल्पना परिक्षकांना आवडली तर ते त्या व्यक्तीच्या व्यावसायासाठी मदत करतात. असा हा कार्यक्रम आहे. सध्या हा कार्यक्रम अनेक लोक आवडीने पाहात आहेत. पण या शोमधील परिक्षक कोण आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घेऊयात या परिक्षकांबाबत 


विनीता सिंह :  'शुगर' या प्रसिद्ध कंपनीची विनीता ही को- फाऊंडर आहे. तिने  दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर तिने IIT मद्रास येथून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची डिग्री घेतली. तसेच विनीताने  IIM अहमदाबाद येथून मॅनेजमेंटमध्ये मास्टर केले. 


अश्नीर ग्रोव्हर :  भारत पे कंपनीचे को- फाऊंडर असणाऱ्या अश्नीर ग्रोव्हर यांनी  IIT दिल्लीमधून सिविल इंजिनियरिंग मध्ये B-Tech की डिग्री मिळवली आहे. तसेच त्यांनी IIM अहमदाबाद मधून  MBA केले आहे. 


नमिता थापर :  नमिता थापर या Emcure Pharma या कंपनीच्या एग्झिक्यूटिव डायरेक्टर आहेत. नमिता यांनी ICAI मधून चार्टर्ड अकाउंटिंगची  डिग्री मिळवली आहेत. तसेच त्यांनी  ड्यूक यूनिवर्सिटमधून  MBA केले आहे.  


अमन गुप्ता : BOAT या कंपनीचे अमन गुप्ता को- फाऊंडर आणि मार्केटिंग डायरेक्टर आहेत. अमन यांनी  दिल्ली यूनिवर्सिटीमधून BBA केले आहे. 


गजल : मामाअर्थ या प्रसिद्ध कमपनीची गजल ही को- फाऊंडर आहे. तिने  न्यूयॉर्क  अॅकॅडमी ऑफ आर्ट्समधून मॉर्डन आणि डिझाइन- अप्लाइट आर्ट हा कोर्स केला आहे.


पीयूश बंसल : पीयूश हे लेन्सकार्ट कंपनीचे CEO आहेत.  त्यांनी  McGill University कॅनेडामधून शिक्षण घेतले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Neha Kakkar : 500 रूपयांच्या नोटा वाटणं नेहाला पडलं महागात; लहान मुलांनी घेरलं, पाहा व्हिडीओ


The Kapil Sharma Show  : अक्षयनं घेतला कपिलचा आशीर्वाद? कपिलनं सांगितला फोटो मागील किस्सा


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha