The Kapil Sharma Show  : 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते.  बॉलिवूडमधील अनेक कलाकार या शोमध्ये येऊन त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करतात. काही दिवसांपूर्वी द कपिल शर्मा शोमध्ये अभिनेता अक्षय कुमारनं  (Akshay Kumar) हजेरी लावली होती. त्यावेळी अक्षय आणि कपिलचा एक फोटो व्हायरल झाला. त्यावर कपिलनं हटके रिअॅक्शन दिली आहे. 


कपिलनं अक्षय नमस्कार करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो शेअर करून त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, 'प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार त्यांच्या बेलबॉटम या चित्रपटासाठी आशीर्वाद घेताना.' नेटफ्लिक्सवरील शो  'कपिल शर्मा: आय एम नॉट डन स्टिल' हा रिलीज होण्याआधी कपिलनं एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यानं या फोटोमागील एक गोष्ट सांगितली. त्याने सांगितले की, अक्षय त्याला आशीर्वाद कसा घेतात ते शिकवत होता. तेव्हा त्याने फोटोग्राफरला फोटो काढायला लावला.  






कपिलचा   'कपिल शर्मा: आय एम नॉट डन स्टिल' हा शो 28 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.  23 एप्रिल  2016 रोजी 'द कपिल शर्मा' शोची सुरूवात झाली.  अभिनेता सलमान खान या शोचा निर्माता आहे. कपिल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. तर कृष्णा अभिषेक ,भारती सिंह,किकू शारदा,सुमोना चक्रवर्ती हे कलाकार त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवतात. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Neha Kakkar : 500 रूपयांच्या नोटा वाटणं नेहाला पडलं महागात; लहान मुलांनी घेरलं, पाहा व्हिडीओ


Sumona Chakravarti : 'द कपिल शर्मा शो'मधील सुमोना एका एपिसोडसाठी घेते लाखोंचं मानधन; देतेय 'या' आजाराशी झुंज


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha