Neha Kakkar : बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) तिच्या गाण्यांनी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. नेहाचा चाहता वर्ग मोठा आहे.  नेहाने अनेक रिअॅलिटी शो तसेच गाण्यांच्या कार्यक्रमांचे परिक्षण केले आहे. नेहाची गाणी सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत असतात. पण सध्या नेहाचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नेहा घाबरलेली दिसत आहे. 

Continues below advertisement


व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नेहा गरीब मुलांना 500 रूपयांच्या नोटा देताना दिसत आहे. नेहा पैसे वाटत आहे, हे पाहिल्यानंतर अनेक लहान मुलांनी पैसे घेण्यासाठी नेहाच्या गाडीकडे धाव घेतली. नेहा मुलांनी केलेल्या गर्दीला पाहून घाबरली. अनेक मुलांनी तिला घेरले होते. अस्वस्थ झालेल्या नेहाने घाबरून गाडीची काच वर केली आणि नेहाची गाडी पुढे निघून गेली. 


पाहा व्हिडीओ-






असाच एक व्हिडीओ नॅशनल क्रश रश्मिकाचा देखील व्हायरल झाला होता. पण रश्मिकानं लहान मुलांची मदत केली नव्हती. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल देखील केले होते.  


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Tollywood Actors : अल्लू अर्जुन ते महेश बाबू ; हे दाक्षिणात्य स्टार्स एका चित्रपटाचे घेतात एवढे मानधन


Deepika Padukone, Ranveer Singh : बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स दीपिका अन् रणवीरची पहिली भेट; अशी आहे दोघांची लव्ह स्टोरी


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha