Shark Tank India: छोट्या पडद्यावरील 'शार्क टँक इंडिया-2' (Shark Tank India-2) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनप्रमाणेच दुसऱ्या सीझनला देखील प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. 'शार्क टँक इंडिया' या शोमध्ये स्वत:चा व्यवसाय असणारे लोक येतात. हे लोक शोमधील परीक्षकांना त्यांची बिझनेस आयडिया सांगतात. शार्क टँक शोमधील पूर्व कंटेस्टंट अक्षय शाह  (Akshay Shah) यानं शार्क टँकमधील परीक्षकांबद्दल एक ट्वीट शेअर केलं आहे.  त्याच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. 


अक्षय शाह हा आयवेबटेक्नोचा (iWebTechno)  फाउंडर आणि सीईओ आहे. अक्षयनं शार्क टँकच्या पहिल्या सिझनमधील एका एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. त्यानं नुकतच एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, 'काल मी एका फाउंडरला भेटलो. त्यानं सिझन-1 मध्ये  2 शार्क्ससोबत डिल केली होती. त्यानंतर त्या शार्क्सनं त्याच्या मेलला रिप्लाय देखील दिला नाही आणि ते शार्क्स त्याला कधीही भेटले नाहीत. अब क्या बोले?' अनेक ट्विटर युझर्सनं अक्षयला त्या दोन शार्क्सची नावं विचारली. पण त्यानं नावं सांगण्यास नकार दिला.






नमिता थापर (Namita Thapar), अनुपम मित्तल (Anupam Mittal), अमित जैन (Amit Jain), पियूष बंसल ( Peyush Bansal) आणि विनीता सिंह (Vineeta Singh) हे शार्क टँक-2 या कार्यक्रमाचे परीक्षण करतात. शार्क टँक इंडिया या कार्यक्रमाच्या पाहिल्या सिझनमध्ये अश्नीर ग्रोवर आणि गझल अलग हे दोन शर्क्स दुसऱ्या सिझनमध्ये परीक्षक म्हणून सहभागी झाले नाहीत. 


 'शार्क टँक इंडिया' या शोमध्ये स्वत:चा व्यवसाय असणारे लोक त्यांच्या वेगवेगळ्या बिझनेस आयडिया घेऊन येतात. त्यामधील काही कल्पना या अतरंगी देखील असतात. या शोमधील परीक्षक हे शोमध्ये येणाऱ्या व्यक्तींसोबत संवाद साधून त्यांच्या आयडिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. जर त्या व्यक्तीची कल्पना परीक्षकांना आवडली तर ते त्या व्यक्तीच्या व्यावसायासाठी मदत करतात, असा हा कार्यक्रम आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Jethalal In Shark Tank India 2 : शार्क टँकमध्ये पोहोचला 'जेठालाल'; हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही खळखळून हसाल