Nava Gadi Nava Rajya : प्रेमाचा आठवडा सुरू झाला असून आता मराठी मालिकांमध्येदेखील (Marathi Serial) प्रेमाच्या आठवड्याला सुरुवात झाली आहे.  'नवा गडी नवं राज्य' (Nava Gadi Nava Rajya) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता या मालिकेत राघव आणि आनंदीच्या नव्या नात्याची सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. 


'नवा गडी नवं राज्य' मालिकेच्या येत्या भागात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार? 


आनंदी आणि राघवच्या आयुष्यात सुखाचे क्षण यावे यासाठी वर्षाने हनीमूनचा प्लॅन केला. रमाच्या नाकावर टिच्चून आनंदी राघवसोबत हनिमूनला जायला निघते. एका ठिकाणापर्यंत पोहोचल्यावर लक्षात येते की, पुढे जायला रस्ताच नाही, आनंदी हट्टाला पेटून राघवला चालत घेऊन पुढे जाते. त्या ठिकाणावर पोहोचल्यावर नेटवर्क नसल्याने राघवची चिडचिड होते, राघव इकडे येऊनसुद्धा ऑफिसच्या कामातच असल्याने आनंदी रुसली आहे. 


आनंदीला मनविण्यासाठी राघव बोटीची सफर प्लॅन करतो पण अचानक तोल जाऊन तो पाण्यात पडतो. आनंदी राघवला बुडण्यापासून वाचवते, बेशुद्ध अवस्थेतल्या राघवकडे ती मनातल्या भावना व्यक्त करते, त्याचवेळेस राघवचे डोळे उघडतात आणि तो सुद्धा आपल्या मनातल्या भावना आनंदी समोर व्यक्त करतो. 


'नवा गडी नवं राज्य' ही मालिका आता रोमॅंटिक वळणावर आली आहे. या मालिकेत आता तरी आनंदी आणि राघवचा सुखी संसार सुरू होईल की रमा पुन्हा आनंदीसमोर नवी आव्हानं निर्माण करेल हे पाहणं प्रेक्षकासाठी औत्सुक्याचं असणार आहे. 






अनिता दातेची अतरंगी भूमिका


'नवा गडी नवं राज्य' या मालिकेत अनिता दाते (Anita Date),कश्यप परुळेकर (Kashyap Parulekar), (Pallavi Patil) पल्लवी पाटील, वर्षा दांदळे (Varsha Dandale) हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या मालिकेत अनिता दाते अतरंगी भूमिकेत आहे. 


घरावर राज्य असणाऱ्या एकीचा अर्धवट राहिलेला संसार पूर्ण करायला दुसऱ्या बायकोवर आलेलं राज्य म्हणून या मालिकेचं नाव ‘नवा गडी नवं राज्य’ असं ठेवण्यात आलं आहे. वेगळा विषय असल्याने ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.


संबंधित बातम्या


Nava Gadi Nava Rajya : दोघींच्या संसाराची गोड गोष्ट सांगणारी 'नवा गडी नवं राज्य'; 8 ऑगस्टपासून मालिका प्रेक्षकांच्या भेटीला