Bigg Boss 16: छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) च्या ग्रँड फिनालेला अवघे काही दिवस राहिले आहेत.  बिग बॉसच्या या सिझनचा विजेता कोण ठरणार आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अनेक वेळा या शोमधील स्पर्धकांमध्ये वाद होतात. या शोमध्ये  वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात.  शालीन भनोट (Shalin Bhanot), अर्चना गौतम (Archana Gautam), एमसी स्टॅन (MC Stan), शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि प्रियांका चाहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) हे या  सिझनमधील टॉप-5 सदस्य आहेत. नुकताच बिग बॉसमधील एका स्पर्धकाचा फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. 


अर्शी खाननं सोशल मीडियावर शेअर केला फोटो 


अर्शी खाननं बिग बॉसच्या दोन सिझनमध्ये सहभाग घेतला होता. तिच्या विनोदी आणि हटके शैलीनं अनेकांची मनं जिंकली. अर्शीनं नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रियांका चाहर चौधरीच्या हातात ट्रॉफी दिसत आहे. अर्शीनं शेअर केलेला हा प्रियांकाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे आता 'प्रियांका ही ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16 Winner Name) ची विनर ठरेल का?' असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. या फोटोला अर्शीनं कॅप्शन दिलं, 'तीन ट्रेंड्स सध्या व्हायरल होत आहेत, माझ्यामते प्रियांकानं ट्रॉफी जिंकली आहे. '






जाणून घ्या प्रियांका चाहर चौधरीबद्दल


प्रियांका चाहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) ही ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) या सिझनमधील स्ट्राँग स्पर्धक आहे. 26 वर्षाच्या प्रियांकाने ‘ये है चाहतें’, ‘परिणीती’  या शोमध्ये काम केले आहे. 'उडारिया' या मालिकेमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिनं तेजो संधू ही भूमिका साकारली होती. 


बिग बॉस (Bigg Boss) या शोमधील स्पर्धकांमध्ये वाद होत असतात. विकेंडला सलमान खान शोमध्ये येऊन बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धकांसोबत संवाद साधतो. बिग बॉसच्या या सिझनचा विजेता कोण ठरणार आहे? याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या :


Bigg Boss 16: शिव ठाकरे अन् एमसी स्टॅनला मागे टाकत ही अभिनेत्री ठरणार बिग बॉसची विजेती? सोशल मीडियावर चर्चेला उधाण