Marathi Serial :  तुषार दळवी (Tushar Dalvi) आणि हर्षदा खानविलकर (Harshada Khanvilkar) मुख्य भूमिकेत असलेली 'लक्ष्मीनिवास' ही मालिका लवकरच झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर सुरु होणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आलाय. या मालिकेचा नवा प्रोमो पाहून कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याची उत्सुकता लागून राहिली होती. त्यातच आता दोन वर्षांनी सातव्या मुलीची सातवी मुलगी (Satvya Mulichi Satavi Mulgi ) ही मालिका दोन वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं जातंय.


याचदरम्यान सोशल मीडियावर एका पोस्टवरुन कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याचा अंदाज वर्तवला जातोय. सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं जातंय. सोशल मीडियावर एक पोस्ट नुकतीच शेअर करण्यात आलीये. यावरुन दोन वर्षांनी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं जातंय. 


म्हणून मालिका जाणार ऑफ एअर?


सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका मागील दोन वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीमध्ये आहेत. झी मराठी वाहिनीवरील टीआरपीमध्ये अव्वल असणाऱ्या मालिकेमध्ये सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका टॉपला आहे. पण आता झी मराठीवर लवकरच लक्ष्मीनिवास ही मालिका सुरु होतेय. त्यामुळे सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका ऑफ एअर जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. यामुळे प्रेक्षकांनाही धक्का बसलाय. 


मालिकेत हे कलाकार मुख्य भूमिकेत


‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत तितिक्षा तावडे आणि अजिंक्य ननावरे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसंच, या मालिकेत ऐश्वर्या नारकर, मुग्धा गोडबोले,रजनी वेलणकर, अजिंक्य जोशी, जयंत घाटे, राहुल मेहेंदळे हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील. किरण बिडकर आणि अभिराम रामदासी हे या मालिकेचे लेखक आहेत. तर, मालिकेची निर्मिती आयरिस Production (विद्याधर पाठारे) यांनी केली आहे.                  






ही बातमी वाचा : 


Prasad Jawade : 'म्हणूनच त्याने "सर्वोत्कृष्ट नायक" ह्या मृगाची शिकार केली !' प्रसादला मिळालेल्या बक्षिसाचं खऱ्या आयुष्यातील 'पारु'ने केलं भरभरुन कौतुक